🕒 1 min read
मुंबई : २७ एप्रिल रोजी कोविडविषयक घेतलेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पेट्रोल-डिझेलवरील कराचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारने व्हॅट कमी न केल्यानेच महाराष्ट्रातील जनतेला त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप केला. दरम्यान, या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याविषयी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाष्य केले असून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की, ‘केंद्राचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरत आहे. विकत घेतलेले बहुमत म्हणजे सुशासन नाही. देश राम भरोसे व भोंगे भरोसे चालला आहे. महागाई, कोरोना, बेरोजगारीवरून लक्ष उडविण्यासाठी पंतप्रधान वादग्रस्त विषयांना फोडणी देत आहेत. हे लक्षण बरे नाही. तुम्ही महाराष्ट्रासारख्या राज्यावर महागाईचे खापर फोडता, मग केंद्र सरकार काय करते? हा प्रश्न उरतोच. मागे कोरोना संक्रमणाची जबाबदारीही महाराष्ट्रावर टाकून पंतप्रधान नामानिराळे राहण्याचे प्रयत्न करीत होते. अशाने केंद्र व राज्यांतील संघर्षाचा भडका उडेल. मोदींना तेच हवे आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी व त्यांचा पक्ष म्हणजे एक अजब रसायन आहे. देशभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने चौथी लाट येईल की काय, या चिंतेने पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला, हे कौतुकास्पद आहे. कोरोना प्रतिबंधक लस, ऑक्सिजन पुरवठा, रुग्णालयांची तयारी यांचा आढावा घेतला. हे सगळे ठीक असले तरी या कोरोना बैठकीमागचा मूळ हेतू वेगळाच होता. बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ‘टोमणे’ मारणे, हाच या संवाद बैठकीचा हेतू होता’, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- रोहित पवारांचे फडणवीसांना आकडेवारीसह जोरदार प्रत्युत्तर!
- गणेश नाईक यांच्यावर आरोप करणारी महिला राष्ट्रवादीत जाणार ?
- Mungantiwar vs Nilam Gorhe | “मुनगंटीवार जे बोललेत त्याचा त्यांना पश्चाताप…”- नीलम गोऱ्हे
- IPL 2022 DC vs KKR : कुलदीपचा पुन्हा चौकार..! कोलकाताचं दिल्लीला १४७ धावांचं आव्हान
- IPL 2022 DC vs KKR : कोलकाताचा अजून एक पराभव; दिल्लीसाठी कुलदीप पुन्हा ठरला गेमचेंजर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

