🕒 1 min read
एकेकाळचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगत आहे. यातच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीसोबत युतीचा विचार सुरु होता. तरी देखील आम्ही शिवसेनेसोबत गेलो, ही आमची चूक होती, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले होते. त्यावरच आता उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रत्युत्तर दिल आहे.
सुधीर मुनगंटीवार जे बोलले आहेत, त्याचा त्यांना पश्चाताप होणार नाही याची काळजी घ्यावी, असा खोचक टोला त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या :


