Share

IPL 2022 DC vs KKR : कोलकाताचा अजून एक पराभव; दिल्लीसाठी कुलदीप पुन्हा ठरला गेमचेंजर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये ४१व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सला (DC vs KKR) ४ गडी राखून हरवले. वानखेडेवर रंगलेल्या या सामन्यात दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कुलदीप यादवच्या ४ बळींमुळे कोलकाताला २० षटकात १४६ धावांपर्यंतच पोहोचता आले. प्रत्युत्तरात दिल्लीने ६ गडी गमावले, पण डेव्हिड वॉर्नर (४२) आणि रोवमन पॉवेल (नाबाद ३३) यांच्या खेळीमुळे १९व्या षटकात विजय मिळवला. कोलकाताचा हा सलग पाचवा पराभव ठरला.

दिल्लीचा डाव

कोलकाताच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला चांगली सुरुवात करता आली नाही. वेगवान गोलंदाज उमेश यादवने पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉला तंबूत पाठवले. त्यानंतर उमेशने मिचेल मार्शलाही (१३) व्यंकटेश अय्यरकरवी झेलबाद केले. डेव्हि़ड वॉर्नर आणि ललित यादव यांनी अर्धशतकी भागीदारी ठोकत संघाला सावरले. हर्षित राणाने वॉर्नरचा अडथळा दूर केला. वॉर्नरने २६ चेंडूत ८ चौकारांसह ४२ धावा केल्या. सुनील नरिनने ललितला (२२) बाद केले. ऋषभ पंत (२) स्वस्तात बाद झाल्यानंतर रोवमन पॉवेल (नाबाद ३३) आणि शार्दुल ठाकूर (८) यांनी १९व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकाताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ बळी घेतले.

कोलकाताचा डाव

आरोन फिंच आणि व्यंकटेश अय्यर यांना कोलकाताला चांगली सुरुवात करून देता आली नाही. वेगवान गोलंदाज चेतन साकारियाने फिंचची (३) दांडी उडवली, तर अक्षर पटेलने व्यंकटेशला (६) बाद केले. त्यानंतर कप्तान श्रेयस अय्यरने संयमी फलंदाजी केली. एका बाजूने फलंदाज ढेपाळत असताना श्रेयसने ४ चौकारांसह ४२ धावा केल्या. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने श्रेयससह आंद्रे रसेललाही गुंडाळले रसेल शून्यावर बाद झाला, कोलकाताने ८२ धावांत ६ फलंदाजांना गमावले. त्यानंतर रिंकू सिंहसह नितीश राणाने किल्ला लढवला. राणाने अर्धशतक ठोकत बहुमूल्य धावा जोडल्या. त्याने ३ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावा जोडल्या. रिंकूने ३ चौकारांसह २३ धावा केल्या. २०व्या षटकात मुस्तफिजूरने कोलकाताच्या ३ विकेट्स घेतला आणि फक्त २ धावा दिल्या. २० षटकात कोलकाताने ९ बाद १४६ धावा केल्या. दिल्लीकडून कुलदीपने ३ षटकार १४ धावा देत ४ बळी टिपले. मुस्तफिजूरने ३ बळी घेतले.

दोन्ही संघांची playing 11

दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कप्तान), मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, रोवमन पॉवेल, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया.

कोलकाता नाइट रायडर्स – आरोन फिंच, सुनील नरेन, श्रेयस अय्यर (कप्तान), नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, बाबा इंद्रजित (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, उमेश यादव, टीम साऊदी, हर्षित राणा.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!