🕒 1 min read
मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. या मतदानानंतर भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर लागलेल्या निकालात शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“आमच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार अर्थातच पक्षाचे आमदार तिकडे गेले नाही तर काही अपक्ष आमदार त्यांच्याकडे गेले. काही जणांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्यात आला. तर कुठे वेगळे व्यवहार झाले. आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू.”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच भाजपने नक्कीच जागा जिंकली, पण त्यांचा विजय झाला असे मी समजत नाही. पहिल्या पसंतीची ३३ मतं संजय पवार यांना मिळाली. तर धनंजय महाडिक यांचा दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर विजय झाला. त्यामुळे पहिल्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांचा हिशोब झाला असता तर आम्ही जवळपास जिंकलो होतो. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धाकड चित्रपटाच्या अपयशानंतर कंगना रणौत गेली कुटुंबासोबत फिरायला ; पहा PHOTO
- “वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा…”, राज्यसभा निकालानंतर संभाजीराजेंचे ट्वीट चर्चेत
- ‘या’ राज्यात रेशनचे धान्य मिळणार एटीएम मशीनद्वारे ; वाचा सविस्तर
- “फडणवीसांनी विविध मार्गाने माणसं…”, राज्यसभा निकालानंतर शरद पवारांचे वक्तव्य
- Rajya Sabha election results : “मला स्वतःला धक्का बसेल असा…”, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
