Share

Rajya Sabha election results : “मला स्वतःला धक्का बसेल असा…”, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. या निकालावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मला धक्का बसेल असा मोठा निकाल हा नाही. मतांची संख्या बघता प्रत्येक उमेदवाराची राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कोटात काही फरक पडलेला नाही. फक्त एक मत प्रफुल्ल पटेल यांना ज्यादा पडलं. ते कुठून आलं ते मला ठावूक आहे. ते या आघाडीचं नाही. दुसऱ्या बाजूचे आहे.  असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

तसेच आमच्याकडे पुरेसा कोटा होता. त्यानुसार प्रत्येक उमदेवाराला मते मिळाली. सहाव्या जागेसाठी मोठा गॅप होता आणि  आमच्याकडे मतांची संख्या कमी मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली. राजकारणात रिस्क घ्यावीच लागते. तरीही सहाव्या उमेदवारांने चांगली मते घेतली. तसेच या निवडणुकीत अपक्षांची मते फुटली असल्याचेही शरद पवारांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!