उत्तराखंड : सरकार नागरिकांना आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून अनेक प्रयत्न करत आहे. वेगवेगळ्या योजनांची देखील अंमलबजावणी करत आहे. आता एक नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता सरकारने अन्न वितरण व्यवस्थेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एटीएम मधून तुम्ही पैसे काढता. मात्र तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल अशाच प्रकारची रेशन प्रक्रिया देखील सुरू होणार आहे.
ही योजना उत्तराखंडमध्ये सुरू होणार आहे. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना रेशन बाबत होणारा त्रास कमी होईल. राज्याच्या अन्न मंत्री रेखा आर्य यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत राज्यात अन्नधान्य एटीएम सुरू होणार असून या योजनेला मंजुरीदेखील मिळाली आहे. सध्या ही योजना फक्त ओरिसा आणि हरियाणा राज्यात सुरू आहे. आणि आता उत्तराखंड मध्ये सुरु होत असल्याची बातमी समोर येत आहे.
ही यंत्रणा एटीएम मशीन प्रमाणे काम करणार आहे. एटीएम मशीनद्वारे गहू, तांदूळ, व डाळी काढता येणार आहे. ही योजना लवकरात लवकर आमलात येण्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहेत. अनेक ठिकाणी रेशन देण्याबाबत काळाबाजार चालू आहे. गोरगरीब जनतेची लुटमार होत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या :

