भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ने अधिकृत निवेदन पत्रकारांसमोर जाहीर करुन भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघातील चार खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील तिघांना असं एकूण सात जणांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याची माहिती दिली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध येत्या 6 फेब्रुवारीपासून म्हणजेच रविवारपासून सुरु होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय कसोटी संघातील सलामीवीर मयंक अग्रवालचा 18 सदस्यीय संघात समावेश करण्यात आल्याची माहिती दिली आहे. भारत वेस्टइंडीज संघाविरुद्ध तीन एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एकदिवसीय आणि कोलकात्याच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर तीन टी-20 सामने खेळवण्यात येणार आहेत. भारतीय क्रिकेट संघातील तीन क्रिकेटपटुंचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अखिल भारतीय निवड समितीने मयंक अग्रवालचा एकदिवसीय संघात समावेश केल्याची माहिती बीसीसीआयने निवेदनाद्वारे दिली आहे. आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघातील सर्वच खेळाडूंना 31 जानेवारी पर्यंत अहमदाबाद येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते. स्वतःच्या शहरातून निघण्याआधी RT-PCR टेस्ट करण्यास सांगितले होते.
तो रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तरच प्रवास ग्राह्य धरला जाणार होता. बीसीसीआय ने जाहीर केलेल्या निवेदनानुसार शिखर धवन, श्रेयस अय्यर , ऋतुराज गायकवाड आणि नवदीप सैनी या चार खेळाडूंना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तर भारतीय खेळाडूंच्या सहाय्यक संघा पैकी पण टी. दिलीप, सुरक्षा लायसन अधिकारी बी लोकेश आणि स्पोटर्स मसाज थेरपीस्ट राजीव कुमार यांना कोरोना विषाणूची ची बाधा झाली आहे. या चार प्रमुख खेळाडूंना झालेल्या कोरोना विषाणूच्या बाधेमुळे भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अग्रवाल याला तब्बल दीड वर्षानंतर भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात स्थान मिळाले आहे.
- महत्वाच्या बातम्या :
- “ते भावनेच्या भरात आरोप…”; रणजित डिसलेंचे स्पष्टीकरण
- “राहुल गांधींचे विधान म्हणजे नीच टूलकिटच्या पुढच्या प्रवृत्तीच्या आंदोलनाची प्रस्तावना तर नव्हे?”
- “ पृथ्वी शॉ तर दुसरा सेहवाग ”; ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचे वक्तव्य
- “अर्णव गोस्वामीला घरातून उचलून आणताना परमबीर सिंह गळ्यातले ताईत होते आता खंडणीचे आरोपी झाले?”
- रोजगार हमी योजनेतून बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल-राज्यमंत्री अब्दुल सत्तार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

