सोलापूर: ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले होते. त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर लाचखोरीचा आरोप केला होता, पण आता तो आरोप त्यांनी भावनेच्या भरात केला असल्याचे मान्य केले आहे.
अमेरिकेतील विद्यापीठात त्यांना प्रवेश आणि फुल फुलब्राईट अभ्यासवृत्ती मिळाल्याचे पत्र सादर करून तत्सम शिक्षणासाठी मला अमेरिकेत जायचे आहे. त्यासंदर्भी सुट्टीसाठी मी सोलापूर जिल्हा परिषदेत अर्ज केला होता, पण तो मान्य होत नव्हता. तेव्हा मी भावनेच्या भरात येऊन लाचखोरीचे आरोप केले होते, असे त्यांनी मान्य केले आहे. या विधानानंतर समाज माध्यमांवर त्यांच्यासाठी सहानुभूतीची लाट तयार झाली होती. त्यामुळे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी त्यांची रजा तत्काळ मंजूर केली.
पण रजेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता डिसलेंनी केलेली नाही. त्यांना नक्की कोणती अभ्यासवृत्ती मिळाली आहे, ते अमेरिकेत जाऊन कशाचा अभ्यास करणार आहेत, किती दिवस अभ्यास करणार आहेत? याबद्दल कोणती ही माहिती डिसलेंनी सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागाला दिलेली नाही. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशनच्या तर्फे दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज जगभरातील ४० शिक्षकांना जाहीर केला जातो. पीस इन एज्युकेशन (Peace in education) या विषयावर अमेरिकेतील विद्यापीठात संशोधन करण्यासाठी त्यांना ही स्कॉलरशीप दिली जाते.
महत्वाच्या बातम्या:
“राहुल गांधींचे विधान म्हणजे नीच टूलकिटच्या पुढच्या प्रवृत्तीच्या आंदोलनाची प्रस्तावना तर नव्हे?”
SSC-HSC Board Exams: दहावी, बारावीची परीक्षा ऑफलाईन होणार ; राज्य शिक्षण मंत्रिमंडळाचा निर्णय
“कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी…”,पडळकरांचे ट्वीट ठरतेय चर्चेचा विषय
नितेश राणेंच्या अटकेनंतरचा ‘तो’ फोटो व्हायरल, जाणून घ्या काय आहे या फोटो मागचे सत्य\
समीर वानखेडेंना धक्का, संजय राऊतांच्या व्याह्यांकडून नवी मुंबईतील सद्गुरु बारचा परवाना रद्द


