Share

सुरवातीच्या कलांनुसार बंगालमध्ये भाजपची जोरदार मुसंडी; नंदीग्राममधून बॅनर्जी १५०० मतांनी पिछाडीवर

Published On: 

कोलकत्ता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मजमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचे पहिले कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये कडेकोट बंदोबस्तात सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टपाली मतदानांची मोजणी सुरू झाली आहे. या कलानुसार तृणमूल आणि भाजप मध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकालाची मतमोजणी सुरू असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत. ममता दीदी तब्बल १५ हजार मतांनी पिछाडीवर असून तृणमूल ची चिंता वाढली आहे.

तर सुरुवातीच्या कलांमध्येच भाजपने बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळत आहे. भाजपने ११० जागांवर आघाडी मिळवली आहे. तर तृणमूल कॉंग्रेस १३७ जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु कॉंग्रेसच्या पदरात घोर निराशा पडल्याचे चित्र दिसत आहे. कॉंग्रेसला केवळ ६ जागांवर आघाडी असल्याचे चित्र साध्या दिसत आहे.

विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी १४८ ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!