औरंगाबाद : तिसऱ्या लाटेची संभाव्य भीती लक्षात घेता त्या दृष्टीने जास्तीत जास्त लसीकरण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी आज दिल्या आहेत. शनिवारी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी लसीकरण केंद्रांना भेटी दिल्या. या वेळी लसीकरण केंद्रावरील उपाययोजना सेवा – सुविधांची पाहणी या वेळी चव्हाण यांनी केली.
या वेळी १८ वर्षांवरील नागरिकांना शनिवारपासून लस देण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान हे लसीकरण करण्यासाठी आलेल्या तरुणांशी जिल्हाधिकारी यांनी संवाद साधला. या नंतर रुग्णालयातील दैनंदीन काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक देखील केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच अपर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी शनिवारी जिल्हा सामान्य रुग्णालय चिकलठाणा येथील कोरोना लसीकरण केंद्राला भेट देऊन पाहाणी केली.
यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय चिकलठाणा येथील ऑक्सिजन प्लांटची त्यांनी पाहाणी देखील केली. सध्या ऑक्सिजनची लाईन जोडण्याचे काम सुरू केलेले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच स्वच्छता संबंधी कुठलीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगून त्यांनी परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सक्तीच्या सूचना देखील या वेळी केल्या. यावेळी डॉ. वाघ तसेच संबंधित आरोग्य अधिकारी तसेच रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
- विनाकारण फिरणाऱ्या ८१ नागरिकांपैकी ४ निघाले ‘कोरोना स्प्रेडर’!
- औरंगाबादेत जागृत हनुमान संस्थानचा सकारात्मक पुढाकार, कोरोना रुग्णांसाठी उघडले मोफत कोविड सेंटर!
- लसी येताच पैठणच्या कोरोना लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी, फिजिकल डिस्टन्सिंगचा पुर्ता बोजवारा !
- केंद्रसरकारवर वारंवार टीका करत बसण्यापेक्षा राज्यसरकारने लस का बुक केली नाही? – आ. लोणीकर
- आजपासून १८ प्लससाठी पाच केंद्रावर पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरण


