🕒 1 min read
मुंबई : ‘महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. राष्ट्रीय स्तरावरही अशा आघाडीची गरज आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारली. भविष्यात त्यांनी या देशात विरोधीपक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभं करावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही.’ असे वक्तव्य काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते.
याच पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘यूपीए आधीपासूनच अस्तित्वात आहे आणि त्यातील प्रमुख पक्ष काँग्रेस आहे. कोणी यूपीए मध्ये येऊ इच्छित असेल तर त्यांचे स्वागतच आहे. पण कोणी तिसरी आघाडी काढायला निघाले असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला देश वाचवायचा आहे आणि देश वाचवायला काँग्रेस सक्षम आहे यूपीए चे दार खुले आहे. जे येतील त्याचं स्वागत केलं जाईल. मी संजय राऊत यांना धन्यवाद देतो, त्यांना ही जाणीव झाली की काँग्रेसच यूपीए चा आत्मा आहे. कारण लोकांच्या जिविताचे रक्षण करणे ही काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे आणि भविष्यातही राहणार आहे.’ असा टोला नाना पटोले यांनी संजय राऊतांना आज लगावला आहे.
UPA चे दार खुले आहे. जे येतील त्याचं स्वागत केलं जाईल. मी संजय राऊत यांना धन्यवाद देतो, त्यांना ही जाणीव झाली की काँग्रेसच UPA चा आत्मा आहे. कारण लोकांच्या जिविताचे रक्षण करणे ही काँग्रेसची भूमिका राहिलेली आहे आणि भविष्यातही राहणार आहे: प्रदेशाध्यक्ष मा. नाना पटोले pic.twitter.com/MBYkspArBu
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 10, 2021
तसेच काल संजय राऊत बोलताना म्हणाले होते कि, ‘महाराष्ट्रात जशी महाविकास आघाडी आहे तशी आघाडी देशात निर्माण व्हावी, मी असं कुठे म्हणतोय की आघाडीला नवं नेतृत्व हवं ते, एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. प्रत्येकाला वाटतं मीच नेता आहे. तसं होत नाही. आघाडी अशीच निर्माण झाली नाही. जसं महाराष्ट्रात तीन पक्षांनी उद्धव ठाकरे यांना नेता केलं आणि सरकार उत्तम चाललंय. महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. तीन भिन्न विचाराचे पक्ष एकत्र आले. त्याचं नेतृत्व आज उद्धव ठाकरे करत आहेत. ही एक आदर्श अशी व्यवस्था आहे. आपण ते निर्माण केलंय. राष्ट्रीय स्तरावर देखील अशी नवनवीन व्यवस्था निर्माण करावी. सगळ्यांनी एकत्र यावं, अशा प्रकारचं मत मी व्यक्त केलं आहे.’ असं संजय राऊत यावेळी म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘संभाजीराव काकडे यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यानं ज्येष्ठ, मार्गदर्शक नेतृत्वं गमावलं’
- ‘सोलापूरकरांवर अन्याय झाला तर राजकारणातून संन्याय घेईल, आमदारकीचाही राजीनामा देईल’
- मराठा समाजाला आरक्षण मिळू नये याची काँग्रेस-राष्ट्रवादीने पायाभरणी केली – घाटगे
- ‘माझ्याकडे नवरा आहे…’; ट्विंकलने युजरला दिले गमतीशीर उत्तर
- कोरोनाच्या खळबळजनक बातम्यांवर बंदी घालण्याची याचिका औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
