Share

Nilesh Rane on Sanjay Raut | संजय राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलरसोबत ; निलेश राणेंचा टोला

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळी ७ वाजेपासून ईडी अधिकारी चौकशी करत आहेत. तपास यंत्रणेचे पथक संजय राऊत यांच्या भांडुप, मुंबईतील घरी सकाळी पोहोचले आहे. त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले जाऊ शकते. दरम्यान, संजय राऊत यांचे वकील यांच्या घरी पोहोचले आहेत. संपूर्ण तपासानंतर ईडीने वकिलाला घरात प्रवेश दिला आहे. 1034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांची चौकशी सुरू आहे. ईडीचे पथक आल्यानंतर संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. राऊत यांचे समर्थक तपास यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देत आहेत. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

निलेश राणे म्हणाले, “ईडीला सहकार्य कारायचे नाही, असे संजय राऊत यांनी ठरवले आहे. म्हणून ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहचले आहेत. एवढा मोठा घोटाळा, त्याचे उत्तर संजय राऊत यांना द्यावे लागले. ब्रिटीश भारत सोडून गेले तेव्हा संजय राऊतांच्या नावाने प्रमाणपत्र सोडून गेले का?”

संजय राऊतांनी नाटके बंद करावीत-निलेश राणे

“संजय राऊत यांनी अश्लील चाळे केले तरी चालतील. महिलांना शिव्या घातल्या तरी चालतील, कुठेही धुमाकुळ घातला तर चालेले, असे राऊतांकडे प्रमाणपकत्र आहे का?. संजय राऊतांनी नाटके बंद करावीत. त्यांनी ईडीला सहकार्य करावे, नाहीतर संजय राऊतांची पुढची मुलाखत जेलमध्ये जेलर सोबत होईल”, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

तपासात सहकार्य न केल्याचा आरोप

महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रकमेच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची चौकशी करत आहे. 1 जुलै रोजी संजय राऊत ईडीसमोर हजर झाले. ईडीने त्यांना 20 जुलै आणि 27 जुलै रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, राऊत ईडी कार्यालयात पोहोचले नाहीत. त्यामुळे त्याच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडीचे पथक राऊत यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी करू शकते, असे मानले जात आहे.

काय आहे पत्रा चाळ घोटाळा?

हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका बांधकाम कंपनीला या भूखंडावर 3000 फ्लॅट बांधण्याचे काम मिळाले. त्यापैकी 672 सदनिका पूर्वीपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात येणार होत्या. उर्वरित रक्कम म्हाडा आणि त्या कंपनीला द्यायची होती, परंतु 2011 मध्ये या मोठ्या भूखंडाचा काही भाग अन्य बिल्डरांना विकण्यात आला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!