Share

Ramdas Kadam on Sanjay Raut | “संजय राऊतांनी बाळासाहेबांची नाही तर शरद पवारांची…” ; रामदास कदम यांचा घणाघात

Published On: 

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी पोहोचले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी दोनवेळा बोलावूनही संजय राऊत तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळेच आज सकाळी ईडीची टीम त्याच्या घरी पोहोचली आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत देखील भडकले आहेत. “खोटी कारवाई, खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही. कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलं. मी शिवसेनेसाठी लढत राहीन”, असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊतांनी बाळासाहेबांची नाही तर शरद पवार यांची शपथ घ्यायला हवी, असा टोला शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी लगावला आहे.

रामदास कदम यांची टीका-

रामदास कदम म्हणाले, “संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवारांचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर शरद पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते.”

संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया-

संजय राऊत यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (शिंदे गट) वक्तव्य आले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “गुवाहाटीहून आमचा मृतदेह आणण्याबाबत बोलणारी व्यक्ती आज अस्वस्थ आहे. भगवान के घर देर है अंधेर नहीं, जैसी करनी वैसी भरनी.”

संजय राऊत यांच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी-

ईडीचे पथक आल्यानंतर संजय राऊत यांच्या घराबाहेर त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली आहे. राऊत यांचे समर्थक तपास यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घोषणा देत आहेत. 1 जुलै रोजी चौकशी केल्यानंतर त्यांना 20 आणि 27 जुलै रोजी समन्स बजावण्यात आले होते, परंतु संसदेचे अधिवेशन असल्याने ते 7 ऑगस्टनंतरच हजर राहू शकतात, अशी माहिती त्यांच्या वकिलांमार्फत देण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने राऊत यांची दादर आणि अलिबागमधील मालमत्ता जप्त केली आहे.

यापूर्वी, ईडीच्या समन्सच्या मुद्द्यावर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचाराचा हवाला देत राऊत यांनी हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. दरम्यान ईडी आता थेट त्यांच्या घरी दाखल झाली आहे.

ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावले होते-

महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची आधीच चौकशी करत आहे. त्यांना ईडीने 27 जुलै रोजी समन्स बजावले होते. मात्र, तो अधिकाऱ्यांसमोर हजर झाला नाही. यानंतर आता ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले आहेत.

काय आहे संपूर्ण प्रकरण-

मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळ हे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचे क्षेत्र आहे. यामध्ये सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे मित्र आहेत. या भागात 50 हजार फ्लॅट बनवण्याचे काम एका खासगी कंपनीला मिळाले. पण 2011 मध्ये त्यातील काही भाग इतर बिल्डरांना विकण्यात आला. या प्रकरणात संजय राऊत यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!