🕒 1 min read
मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) पथक शिवसेना नेते संजय राऊत यांच्या मुंबईतील घरी पोहोचले आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी दोनवेळा बोलावूनही संजय राऊत तपास यंत्रणेसमोर हजर झाले नाहीत. त्यामुळेच आज सकाळी ईडीची टीम त्याच्या घरी पोहोचली आहे. ईडीच्या कारवाईवर संजय राऊत देखील भडकले आहेत. यावर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, “संजय राऊत यांच्यावरील कारवाईला खूप उशीर झाला. ही कारवाई आधीच व्हायला पाहीजे होती. पत्रकार म्हणून सुरुवात करणाऱ्या संजय राऊतांकडे एवढे पैसे कुठून आले. संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पदाचा दुरुपयोग केला. संजय राऊत भ्रष्टाचारी आहेत. या अगोदरच त्यांना अटक करायला हवी होती.”
चोरी केली नाही तर भीती कशाची – नवनीत राणा
महाविकास आघाडीचे एजंट म्हणून संजय राऊत काम करत होते. चोरी केली नाही तर संजय राऊतांना भीती कशाची आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा दुरुपयोग केला. केंद्रावर कशाला आरोप करता, असे नवनीत राणा म्हणाल्या.
रामदास कदम यांचा टोला-
रामदास कदम म्हणाले, “संजय राऊत हे स्पष्टोक्ते आहेत, माझे चांगले मित्रही आहेत पण त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शपथ न घेता शरद पवारांची शपथ घ्यायला पाहिजे होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर शरद पवारांचा अधिक प्रभाव आहे. त्यामुळे त्यांनी जर शरद पवारांची शपथ घेतली असती तर अनेकांना त्यांचे म्हणणे खरे वाटले असते.”
शिंदे गटाची प्रतिक्रिया-
संजय राऊत यांच्यावर ईडीकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (शिंदे गट) वक्तव्य आले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले की, “गुवाहाटीहून आमचा मृतदेह आणण्याबाबत बोलणारी व्यक्ती आज अस्वस्थ आहे. भगवान के घर देर है अंधेर नहीं, जैसी करनी वैसी भरनी.”
तपासात सहकार्य न केल्याचा आरोप-
महाराष्ट्रातील 1000 कोटींहून अधिक रकमेच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक संजय राऊत यांची चौकशी करत आहे. 1 जुलै रोजी संजय राऊत ईडीसमोर हजर झाले. ईडीने त्यांना 20 जुलै आणि 27 जुलै रोजी पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, राऊत ईडी कार्यालयात पोहोचले नाहीत. त्यामुळे त्याच्यावर तपासात सहकार्य न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ईडीचे पथक राऊत यांना ताब्यात घेऊन त्याची चौकशी करू शकते, असे मानले जात आहे.
काय आहे पत्रा चाळ घोटाळा?-
हे प्रकरण मुंबईतील गोरेगाव परिसरातील पत्रा चाळशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. सुमारे 1034 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात संजय राऊत यांची 9 कोटी आणि राऊत यांची पत्नी वर्षा यांची 2 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. रिअल इस्टेट व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी पत्रा चाळमध्ये राहणाऱ्या लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. एका बांधकाम कंपनीला या भूखंडावर 3000 फ्लॅट बांधण्याचे काम मिळाले. त्यापैकी 672 सदनिका पूर्वीपासून येथे राहणाऱ्या रहिवाशांना देण्यात येणार होत्या. उर्वरित रक्कम म्हाडा आणि त्या कंपनीला द्यायची होती, परंतु 2011 मध्ये या मोठ्या भूखंडाचा काही भाग अन्य बिल्डरांना विकण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Kadam on Sanjay Raut | “संजय राऊतांनी बाळासाहेबांची नाही तर शरद पवारांची…” ; रामदास कदम यांचा घणाघात
- Amol Mitkari | ED चे पाहुणे संजय राऊतांच्या घरी पाठवून भाजपने राज्यपालांचा राजीनामा वाचविला – अमोल मिटकरी
- Money Laundering Case | “जैसी करनी वैसी भरनी” ; संजय राऊतांच्या ED कारवाईवर शिंदे गटातून पहिली प्रतिक्रिया!
- Kirit Somayya | “संजय राऊतांना नवाब मलिकांच्या शेजारी राहायला जावं लागणार” ; किरीट सोमय्यांची घणाघाती टीका
- Sanjay Raut | ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया! म्हणाले, “मरेन पण..”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
