मुंबई: डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकाने अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पीडितेच्या आईने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संबंधित प्रकार उघड झाला. दरम्यान यावरूनच भाजपच्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.
‘डोंबिवली सामुहीक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये ८वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झालायं सर्वज्ञानी संजय राऊत जी रोज राज्यातील पोरीबाळींच्या चिंधड्या उडवल्या जाताहेत पण तुम्हाला काळजी सरकार ५ वर्ष टिकण्याची आहे. बाकी या घटनांची तुमच्यालेखी किंमत शुन्य असल्याची खंत चित्रा वाघ यांनी व्यक्त करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
डोंबिवली सामुहीक बलात्काराची घटना ताजी असताना कल्याणमध्ये ८वर्ष चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झालायं @CMOMaharashtra
सर्वज्ञानी @rautsanjay61 जी रोज राज्यातील पोरीबाळींच्या चिंधड्या उडवल्या जाताहेत पण तुम्हाला काळजी सरकार ५ वर्ष टिकण्याची आहे बाकी या घटनांची तुमच्यालेखी किंमत शुन्य pic.twitter.com/vJnFgaoono
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 24, 2021
महिला सुरक्षेच्या प्रश्नावरून आता चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले आहे. ‘महिलांवरील अत्याचाराच्या रोजच्या घटना पाहता असे म्हणता येईल की राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेऐवजी महिलांवर अत्याचाराची तिसरी लाट आहे’, असं म्हणत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर टीकेचे बाण सोडले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राहत्या घरी कोंडल, प्रवासात आडकाठी आणली; सोमय्या करणार उद्या मुंबई पोलिसांविरोधात तक्रार
- ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले- छगन भुजबळ
- आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- लातूरमध्ये क्रीडा केंद्र उभारा, आमदार संभाजी पाटील निलंगेकरांची केंद्रीय क्रीडामंत्र्यांकडे मागणी


