Share

‘संजय राऊत हे संपादकाच्याही लायकीचे नाही’, राणेंची टीका

Published On: 

मुंबई: सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दुपारी सुनावणी पार पडली आहे. सुनावणीदरम्यान १७ सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे.

दरम्यान राणे सध्या पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राणेंवर संजय राऊत यांनी सामनातून टीका केली होती. तसेच राणे  गँगस्टर असून बेताल वक्तव्य करण्यात ते माहीर असल्याचेही त्यांनी  म्हटले होते. यावरच राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.  संजय राऊत हे संपादकीय पदाच्या लायकीचे नाहीत असे वक्तव्य राणे यांनी केले आहे. जर मी गँगस्टर असतो तर शिवसेनेने मला मंत्रीपद का दिले असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

तसेच संजय राऊत यांना नंतर उत्तर देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर शिवसेना माझ्यामुळेच वाढली असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. तसेच ‘शिवसेना वाढली त्यात आमचाही मोठा सहभाग आहे. आत्ता जे अपशब्द वापरतायेत त्यावेळी ते कुठेही नव्हते. आमचा बंदोबस्त करायचा असेल तर करू द्या. पोलिसांनी सगळं पाहावं. चिपळूणमध्ये १७ माणसं होती तिथं प्रचंड गर्दी असं सांगितले. त्यापुढे गेलो तर १३ माणसं. आमच्या घरावर किती माणसं आली मोजली नाही. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे करायचं ते केले. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत का? तुम्ही कुणीही माझं काही करू शकत नाही. तुम्हा सगळ्यांना मी पुरून उरलोय अशा संतप्त भावना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!