Share

Gopichand Padalkar | “शरद पवार साहेबच राज्यात राजकीय बदल करू शकतात…”, गोपीचंद पडळकर यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Published On: 

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमच्या गरवारे क्लबमध्ये शरद पवार यांच्या हस्ते गणपतीचं पूजन करण्यात आलं होतं. यावेळी गरवारे क्लब हाऊसचे सदस्य याप्रसंगी मोठ्या संख्येत उपस्थित होते. मात्र यावरून भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.

गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील जनतेच्या हिताचं काम करत आहेत. त्यांचं हे काम राष्ट्रवादीला पटत नाहीये, फक्त शरद पवार साहेबच राज्यात राजकीय बदल करू शकतात, असा समज सुप्रिया सुळे यांचा आहे. त्यांना वाटतं की त्यांचे वडील केवळ राज्याच्या राजकारणात बदल करू शकतात, असं असताना शिंदे आणि फडणवीस यांनी या समजला छेद दिला हे त्यांना पटत नाही, असं पडळकर म्हणाले.

एक सर्वसामान्य माणसाला भाजपने संधी दिली, एकनाथ शिंदे सारख्या नेत्याला मुख्यमंत्री केल्याचं सुप्रियाताईंना पटलेलं नाही, असं पडळकरांनी यावेळी म्हटलं आहे. अजित दादा पवार फुटले तेव्हा त्यांच्या मागे दोन आमदार नव्हते मात्र एकनाथ शिंदे फुटले तेव्हा त्यांच्या मागे 50 आमदार आहेत, हे सुप्रिया सुळे यांना पटलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत असल्याचं देखील पडळकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक ठिकाणी गणपती दर्शनासाठी जात आहेत. यावरून देखील पडळकरांनी वक्तव्य केलं आहे. गणपती दर्शनासाठी शिंदे आणि फडणवीस काही लोकांच्या घरी जात आहेत. तर त्याचाही त्रास त्यांना होत आहे, वाईट वाटतंय, हे सगळे द्वेषातून होतं आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!