टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या काळात महत्वपूर्ण विधेयक मार्गी लावले आहेत. तर जम्मू काश्मीरला विशेष दर्जा म्हणून देण्यात आलेले कलम 370 देखील हटवले आहे. कलम 370 हटवल्यानंतर शिवसेनेने देखील मोदी सरकारचे अभिनंदन केले. तर राज्यसभेत शिवसेना खा. संजय राऊत यांनी कलाम 370बाबत जोरदार भाषण केले. हे भाषण इतके प्रभावी होते की थेट पाकिस्तानमध्ये देखील त्याचे पडसाद उमटले.
राज्यसभेत कलम 370 बाबत चर्चा सुरु असताना संजय राऊत यांनी सरकारच्या समर्थनात भाषण केले. आता कलम 370 हटवले आहे. भविष्यात बलुचिस्तान देखील भारतात घेऊ, वेळ आली तर पाकिस्तान देखील भारतात विलीन करून घेऊ आणि अखंड हिंदुस्तानचे स्वप्न पूर्ण करू, असे राऊत म्हणाले. राऊत यांच्या भाषणानंतर पाकिस्तानात पोस्टरबाजी पाहिला मिळाली. रस्त्यावर जागो जागी महाभारत या टायटल खाली संजय राऊत यांचे स्टेटमेंट पोस्टर करून लावण्यात आले.

दरम्यान पाकिस्तान मधील या पोस्टरबाजीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पाकिस्तानात होणारी पोस्टरबाजी ही माझी नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. बाळासाहेबांनी अनेक वेळा पाकिस्तानला धक्के दिले आहेत. त्यामुळे हे बाळासाहेबांचे विचार आहेत, असे राऊत म्हणाले.
कोल्हापूर – सांगलीत महापूर, बचावासाठी थेट आर्मी-नेव्ही दाखल
संसदेत ऐतिहासिक विधेयकावर चर्चा होत असताना अमोल कोल्हेंची दांडी
३५अ’च काय संपूर्ण ३७० कलम हटवण्याचा मोदी सरकारचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

