Share

कोल्हापूर – सांगलीत महापूर, बचावासाठी थेट आर्मी-नेव्ही दाखल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात गेले दोन दिवस पावसाने कहर केला आहे. कोल्हापूरमध्ये अतिवृष्टीमुळे आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक लोक पुरात अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्या बचावासाठी गोवा कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापुरात एअरलिफ्टिंगसाठी दाखल झाले आहेत. तसेच एनडीआरएफ आणि नेव्हीचे जवान देखील बचावकार्यासाठी दाखल झाले आहेत.

तर सांगलीत देखील अशीचं आपत्ती आली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कृष्णा नदीला पूर आला आहे. नदी काठचा भाग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. कृष्णा नदीने 54 फूट पाणी पातळी गाठली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागाकडील वाळवा, पलूस, शिराळा या तालुक्यात पूर आला आहे. या पुरात हजारो लोक अडकले आहेत. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी एनडीआरएफच्या टीम बरोबरच लष्करी जवान देखील दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. करवीर, शिरोळमधील आठ गावे पूरग्रस्त आहेत. महिला, मुलं आणि आजारी व्यक्तींना प्राधान्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न करत असल्याची माहित मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. त्यांनी पूरग्रस्कांना तात्काळ मदत पुरवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आरोग्य यंत्रणांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूरग्रस्तांना पिण्याचे स्वच्छ पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्याचे आदेशही देण्यात आले.

Breaking : महाराष्ट्रातील भाजपची महाजनादेश यात्रा स्थगित

बैल कुठं, नांगर कुठं आणि तोंड फोटोकडं, अमोल कोल्हेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल

नवनीत राणा यांचा अनोखा अवतार : डास मारण्यासाठी हाती घेतलं धूर फवारणी यंत्र

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!