Sanjay Raut । मुंबई : शिवसेनेशी बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यात शिंदे सरकार स्थापन केले. यानंतर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आता एकमेकांवर निशाणा साधला जात आहे. यामध्ये शिवसेना खासदार संजय राऊत हे आघाडीवर आहेत. संजय राऊत हे शिंदे सरकार टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. यानंतर आता राऊतांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, सध्या राज्य ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यावर राज्यपालांनी दुर्लक्षच केलं नाही तर राज्यपाल हे दरवाजे खिडक्या बंद करून बसले आहेत. त्यांना आता काहीच दिसत नाही. कायद्याची पायमल्ली दिसत नाही. बेकायदेशीरपणे घेतलेले निर्णय दिसत नाहीत. राज्यात जो रोष निर्माण झाला आहे, तो दिसत नाही. त्यांनी दरवाजे खिडक्या अशाप्रकारे बंद केल्या आहेत की बाहेर जो आक्रोश सुरू आहे त्याची तिरीप सुद्धा त्यांना दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राऊतांनी आता निशाणा साधलाय. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कायद्याला धरून झालेलंच नाही. कायद्याला धरून झालं असतं तर आतापर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असता. पण तो झाला नाही. याचाच अर्थ कायद्याचा आणि घटनेचा काही तरी पेच निर्माण झाला आहे. नाही तर जे सरकार फक्त सत्तेसाठी निर्माण झालं आहे, असं राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Imtiyaz Jaleel । संभाजीनगर नामांतराचा सर्वसामान्य नागरिकांनी विरोध करावा – इम्तियाज जलील
- Sambhaji Chhatrapati : “गडकोटांसाठी स्वंतत्र मंत्रालय स्थापन करा”, संभाजी छत्रपतींची शिंदे सरकारकडे मागणी
- Sambhaji Chhatrapati : “ऐतिहासिक वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर…”, संभाजी छत्रपतींची खंत
- Sanjay Raut : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी; संजय राऊतांची मागणी
- Amol Mitkari : “बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निधी द्यायचा पण…”, अमोल मिटकरींची शिंदे सरकारवर टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

