🕒 1 min read
मुंबई : मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी ईडी कारवाईच्या मुद्यावरून भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला होता. तद्पश्चात आज(११ फेब्रु.) यासंदर्भात पत्रकार परिषद घेत भाजप आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे. तसेच संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर पोहचलेत, असा घणाघातही शेलारांनी केला आहे.
यावेळी बोलत असतांना आशिष शेलार म्हणाले की,‘संजय राऊत हे मानसिक रुग्णतेच्या पर्मोच्च स्थानावर पोहचले आहेत. ते एकाकी पडले असून त्यांना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याची साथ नाही. ईडीकडून चौकशीचा ससेमिरा सुरू आहे त्यामुळे संजय राऊत यांचा थयथयाट सुरू आहेत. त्यामुळेच ते भाजपला बदनाम करत आहे’, असे शेलार म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘राऊतांच्या बाजूने शिवसेनेचा एकही नेता बोलायला सुद्धा तयार नाही. ज्यांच्या मांडीवर राऊत जाऊन बसलेत. त्या राष्ट्रवादीकडून सुद्धा राऊत यांना साथ मिळाली नाही.’ तसेच यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ याच,असे आव्हानही शेलारांनी केले.
महत्वाच्या बातम्या:
- सोमय्यांना सीआयएसएफने संरक्षण दिले पाहिजे होते; जयंत पाटलांचा सल्ला
- “संजय राऊतला एवढी मस्ती, गुर्मी आहे की..”; सोमय्या आक्रमक
- जामीन मिळूनही आशिष मिश्रा तुरुंगातच, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण
- कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
- Goa Assembly Election 2022 : “..तर भाजपला ४० पैकी ४२ जागा मिळू देत”, फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्याला राऊतांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
