Share

“…त्यांच्या प्रचारासाठी मोदी-शहा येणार का?”, संजय राऊतांचा सवाल

Published On: 

पणजी : भाजपचे नेते उत्पल पर्रिकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर या पार्श्वभूमीवरच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपने बलात्कार, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं आहे. अशा व्यक्तीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) येणार आहेत का?, असा सवाल केला आहे.

उत्पल यांनी राजीनामा दिला ही चांगली गोष्ट आहे. भाजपने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. पर्रिकरांनी देशात गोव्याचा लौकिक वाढवला. पण त्यांच्याच मुलाला अपमानित केलं जात आहे. गोव्याच्या जनतेला चांगलं वाटलं नाही. त्यांनी राजीनामा दिला. अपक्ष लढले. आता बेईमानी विरुद्ध चारित्र्य अशी लढाई होणार आहे. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांनी ज्या पणजीचं नेतृत्व केलं, त्या पणजीतून भाजपने बलात्कार, ड्रग्ज, भ्रष्टाचार, भूखंड घोटाळ्याचे आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. ही व्यक्ती आज भाजपचा चेहरा बनली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या प्रचारला येणार आहेत. देवेंद्र फडणवीस तर येऊनच बसले आहेत. अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान उत्पल पर्रीकर यांच्या निर्णयावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ड्रग्स संदर्भात, लँड माफिया संदर्भात ज्याचं नाव गोव्यात अत्यंत संतापाने घेतलं जातं अशी व्यक्ती आणि उत्पल पर्रिकर अशी लढाई आता गोव्यात होणार आहे. उत्पल पर्रिकर यांची संपूर्ण पत्रकार परिषद मी पाहिली. त्यांची वेदना समजू शकतो. ज्या पक्षात जन्म झाला. तो पक्ष सोडून जाताना कशा वेदना होतात हे मी त्यांच्या चेहऱ्यांवरून समजू शकतो. उत्पल आणि हे सर्व असा सामना होणार. आमच्या सर्वांच्या त्यांना शुभेच्छा आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!