Share

अभिनेत्री अथिया आणि केएल राहुल यावर्षी बांधणार रेशमगाठ?, सुनील शेट्टीच्या ट्वीटमुळे चर्चेला उधाण

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कतरिना-विकीच्या लग्नानंतर आता अथिया(Athiya Shetty) -केएल राहुल( KL Rahul) ही जोडी चर्चेत आहे. याबद्दल अभिनेत्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितले, ‘अथिया-राहुलचे लग्न २०२२ मध्ये निश्चित झाले आहे.’ तसेच अहानला( Ahan Shetty) त्याची गर्लफ्रेंड तान्यासोबत लवकरच लग्न करायचे आहे. मात्र सोशल मीडियावर सुनील शेट्टीने (Sunil Shetty) ट्वीट करत यावर प्रतिक्रिया दिली असून चर्चेला उधाण आलं आहे.

बॉलिवूडमधील अनेक कलाकार सध्या लग्नबंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. आता अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया व मुलगा अहान शेट्टी विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. एकिकडे अथिया गेल्या काही दिवासांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुलला डेट करत आहे.

त्यांचे एकत्र फिरतानाचे, डिनर डेटला जातानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जवळपास तीन वर्षे ते रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे अहान शेट्टी हा फॅशन डिझायनर तानिया श्रॉफला (Tania shroff) डेट करत आहे. त्यांचे एकत्र फिरतानाचे फोटो सतत चर्चेत असतात.

दरम्यान बॉलिवूड हंगामाला शेट्टी कुटुंबाच्या अगदी जवळ असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, सुनील शेट्टी यांची दोन्ही मुले, अथिया आणि अहान २०२२ मध्ये लग्न बंधनात अडकणार आहेत. ‘आथिया- राहुल यांचे यावर्षी लग्न होणार आहे. या कपलने कुटुंबीयांची परवानगी घेतली आहे. अहान तानिया श्रॉफसोबत रिलेशनशीपमध्ये आहे. ते दोघेही लग्न करणार आहेत. २०२२ मध्ये ते लग्न करणार आहेत’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र या सर्वावर या चर्चांवर आता स्वत: सुनील शेट्टीने वक्तव्य करत पूर्ण विराम देत सुनील शेट्टीने प्रतिक्रिया दिली आहे. ‘मी एक बातमी वाचली. ती वाचून मी आनंदी होऊ की दु:ख व्यक्त करु हे मला कळत नाहीये. कोणतीही माहिती देण्यापूर्वी ती एकदा तापासून घ्यावी’ या अशयाचे ट्वीट सुनील शेट्टीने केले आहे. यामुळे चाहत्यांना या बातमीत कितपत तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांत कळेलच. सध्या या वृत्ताशी संबंधित व्यक्तीच्या वक्तव्याची प्रतीक्षा करावं लागणार असल्याचं ही बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!