मुंबई: गोवा विधानसभा निवडणुकीचे पडसाद राज्यावारही उमटत आहेत. गोव्यात शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपने आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. तर कालच (२१ जानेवारी) शिवसेनेने आपल्या ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषदेत काही मतदार संघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे स्वतः प्रचाराला उतरतील अशी माहिती दिली आहे. तसेच शिवसेना पक्ष गोव्यासाठी नवीन पक्ष नाही. इथं आमचं दमदार काम असल्याचे संजय राऊत(Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. तर या दाव्यावरूनच भाजपने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मी गोव्यातच आहे कोणी ओळखत नाही तुमच्या पक्षाला.उगाच उसणं अवसान आणू नका. सगळ्या उमेदवारांच्या मतांची बेरीज १००० मतांची होणार नाही. तरी पण शुभेच्छा ..” असा खोचक टोला भाजप नेते राम सातपुते (BJP Leader Ram Satpute) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.
मी गोव्यातच आहे कोणी ओळखत नाही तुमच्या पक्षाला.उगाच उसण अवसान आणू नका.
सगळ्या उमेदवारांच्या मतांची बेरीज 1000 मतांची होणार नाही.
तरी पण शुभेच्छा ..@rautsanjay61 . https://t.co/gH6ZPEV2Rb— Ram Satpute (@RamVSatpute) January 21, 2022
दरम्यान गोव्यात भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे भाजपने बलात्कार, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप असलेल्या व्यक्तीला तिकीट दिलं आहे. अशा व्यक्तीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत का? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे .संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. उत्पल यांनी राजीनामा दिला ही चांगली गोष्ट आहे. भाजपने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं. पर्रिकरांनी देशात गोव्याचा लौकिक वाढवला. पण त्यांच्याच मुलाला अपमानित केलं जात आहे. गोव्याच्या जनतेला चांगलं वाटलं नाही. त्यांनी राजीनामा दिला. अपक्ष लढले. आता बेईमानी विरुद्ध चारित्र्य अशी लढाई होणार आहे. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांनी ज्या पणजीचं नेतृत्व केलं, त्या पणजीतून भाजपने बलात्कार, ड्रग्ज, भ्रष्टाचार, भूखंड घोटाळ्याचे आरोप असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे. ही व्यक्ती आज भाजपचा चेहरा बनली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्यांच्या प्रचारला येणार आहेत. देवेंद्र फडणवीस तर येऊनच बसले आहेत. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणतात “आता वाजवा रे वाजवा…”
- …त्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेश झाला नाही- प्रियंका गांधी
- “कितीही नकली गावगुंड समोर आणले तरी जनता नानाला वाजवणारच”, अनिल बोंडेंचा इशारा
- अजित पवारांची मोठी घोषणा; नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी मंजूर
- प्रियंका चोप्रा बनली आई, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती


