औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लग्न समारंभातील गर्दीला संख्येचे बंधन घालण्यात आले होते, त्यामुळे बँडबाजाच बंद झाला होता. मात्र कोरोना नियमांचे पालन करून आणि दोन डोस घेतलेल्या वाजंत्रीला बँड पथकात सहभागी होण्याची परवानगी मिळाल्याने लग्न समारंभातून कोरोनामुळे हरवलेले सूर पुन्हा कानावर पडणार आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी तसे आदेश दिले आहेत.
याबाबत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. बँडपथकांवर निर्बंध घालण्यात होते. बँडबाजा व्यावसायावर अवलंबून असणाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात बँडपथकांच्या परवानगीबाबत प्रशासनाकडून फेरविचार करण्यात आला. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकरी सुनिल चव्हाण यांनी आदेश जारी केले आहेत.
आता या वाजवा रे वाजवा…… पण अंतर राखून ….. pic.twitter.com/hVptZ7PK9m
— Collector & District Magistrate, Aurangabad (@DMAurangabadMH) January 21, 2022
आदेशात म्हटले आहे की, सध्या लग्न कार्य व इतर मंगलकार्यांचा काळ आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या ९ जानेवारी २०२२ च्या आदेशातील नियमावलीनुसार लग्न समारंभ व इतर अनुषंगिक कार्यक्रम, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नियम लावण्यात आले आहेत. त्यानुसार अशा कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंधांचे पालन करावे. तसेच यासाठी बँड पथकातील वादक कलाकारांच्या रोजीरोटीचा विचार करून काही निर्बंधांसह बँड पथकांना परवानगी देण्यात आली आहे.
काय आहेत आदेश
- लग्न सोहळे व इतर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी बँड वाजवणाऱ्या पथकात ज्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत तेच वाजंत्री सहभागी होऊ शकतील.
- लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या वाजंत्रींनाच बँड पथकात प्रवेश देण्याची संपुर्णत: जबाबदारी बँड व्यवस्थापक, मालकाची राहील.
- लग्न समारंभाच्या बाहेर सुरक्षित अंतर राखून बँडचे सादरीकरण करावे.
- बँड पथकासाठी सादरीकरणावेळी बँड मालकाने थर्मल स्कॅनर, सॅनेटायझरची व्यवस्था करावी.
- मास्क, सॅनिटायझर, सहा फूट अंतर आणि आवश्यकतेनुसार फेसशिल्ड वापरणे आवश्यक.
महत्वाच्या बातम्या
- अजित पवारांची मोठी घोषणा; नाशिक विभागाला ३४६ कोटींचा वाढीव निधी मंजूर
- प्रियंका चोप्रा बनली आई, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती
- तो ‘मोदी’ सापडल्यानंतर पटोले म्हणाले, “भाजपला पंतप्रधान पदाची गरिमा राखता आली नाही”
- “काँग्रेसच्या आत्मविश्वासाचा फुगा गोव्यात इतका फुगला की त्यांना सत्यदर्शनाचे वावडे झाले”
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

