मुंबई : बॉलिबुड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आई बनली आहे. याबाबत प्रियंकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत अधिकृत माहिती दिली आहे. आम्ही पालक झालो असून मला खूप आनंद झाला आहे, असे म्हणत प्रियंकाने आई झाल्याचे जाहीर केले आहे. प्रियंका चोप्राने २०१८ साली गायक व अभिनेता निक जोनाससोबत लग्न केलं होतं. पालक होण्यासाठी या दोघांनी सरोगसीचा पर्याय निवडलेला आहे. प्रियंकाने शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांतच प्रियंकाने सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे जाहीर केले आहे. आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केले असून आम्ही खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे अशा विशेष क्षणी आम्हाला खासगीपणा जपण्याची गरज आहे, अशी इन्स्टाग्राम पोस्ट प्रियंकाने केली आहे.

प्रियंका चोप्रा सरोगसीद्वारे आई बनली आहे. याबाबतचा संदेश प्रियंका चोप्राने दिला आहे. तसेच वडील झाल्याच्या बातमीला निक जोनासनेदेखील पुष्टी दिलेली आहे. मात्र, जन्माला आलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी हे दोघांनीही आद्यापतरी सांगितलेले नाही. दरम्यान, टीएमझेड या वृत्त संकेतस्थळाने प्रियंकाला मुलगी झाल्याचे सांगितलेले आहे. मात्र यावर अजूनतरी शिक्कामोर्तब झालेले नाही.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांना मुंबईबाहेर महाराष्ट्र माहीत नाही अशा वेळी त्यांना पाचवा क्रमांक कसा मिळतो? चंद्रकांत पाटलांचा टोला
- आप आणि शिवसेनेच्या ऑफरवर पर्रिकरांचे उत्तर; म्हणाले,“माझ्या पार्टीच्या ऑफर स्वीकारल्या नाही, तर इतरांच्या….”
- “गोव्यातील भाजपमध्ये फुटताय बंडाळीचे फटाके”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- अभिमानास्पद! जम्मू काश्मीरातील मच्छल खोऱ्यात छत्रपती शिवरायांची मूर्तीस्थापना
- अजिंठा घाटातील ‘ही’ परिस्थिती पाहून राज्यमंत्री सत्तार चांगलेच संतापले..!


