Share

“उध्दव ठाकरे तुमचं भाषण तिथेच संपलं जेव्हा…”, निलेश राणेंचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काल (८ जून) औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. यावेळी पहिल्यांदाच सेनेच्या मंचावर छत्रपती संभाजी राजेंचा पूर्णाकृती पुतळा ठेवण्यात आला होता. त्यातच उद्धव ठाकरे शहराचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याबाबत मोठी घोषणा करणार का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवरच भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्वीट करत खोचक टोला लगावला आहे.

“संभाजीनगर येथील सभेत उध्दव ठाकरे यांचे भाषण सुरू असताना लोकं वैतागून सभा सोडून जात होते. भाषण संपेपर्यंत 40% मैदान रिकामं झालं होतं आणि म्हणे हे लाडके मुख्यमंत्री. उध्दव ठाकरे तुमचं भाषण तिथेच संपलं जेव्हा तुम्ही बोललात मी संभाजीनगर नाव कधीही करू शकतो पण लगेच विषय बदलला.”, असे ट्वीट निलेश राणे यांनी केले आहे.

दरम्यान “शहराचं नामकरण मी आताही करू शकतो. पण शहराचं नाव संभाजीनगर करून तुम्हाला पाणी नाही दिलं, रोजगार नाही दिला, रस्ते नाही दिले, तर संभाजी महाराजांना कसं वाटेल? त्यामुळे आधी शहराचा कायापालट केला जाईल, त्यानंतर शहराचं नामकरण करण्यात येईल.”, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!