Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra Karnataka Borderism) सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही चालू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यासंदर्भात आज माध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
जत तालुक्यातील उमराडी गावात कन्नड वेदिका संघटनेच्या काही लोकांनी झेंडे फडकवले. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. राज्याच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे कुणी धाडस केलं नव्हतं. पण एक दुबळं, विकलांग, मानसिकदृष्ट्या अपंग सरकार राज्यात बसलंय. त्यांना पाठीचा कणा नाही, स्वाभिमान नाही. महाराष्ट्राचा अभिमान नाही. अशा सरकारकडून या राज्याचं रक्षण होईल असं आम्हाला वाटत नाही, अशी टीका संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केलीय.
“तुम्ही पुन्हा गुळमुळीत धोरण स्वीकारून हात चोळत बसणार आहात, दिल्लीकडे बघत बसणार आहात की त्या गावातून झेंडे लावायला घुसलेल्या लोकांना घालवण्यासाठी पुन्हा आसामला जाऊन नवस करणार आहात हे एकदा सांगा”, अशा शब्दांत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
जसं काश्मीरमध्ये येऊन परकीय शक्तींनी झेंडे फडकवावेत, त्या पद्धतीने हे लोक महाराष्ट्रात घुसलेत. त्या सगळ्यांवर राजद्रोहाचे गुन्हे दाखल केले जावेत”, अशी मागणी संजय राऊतांनी केली. हे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत, असा आरोपही संजय राऊतांनी केलाय.
“कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात येतात, झेंडे मिरवतात हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय होणार नाही व यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाचा तरी पाठिंबा असणार”, अशी शंका उपस्थित करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर आरोप केलेत.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “महाराष्ट्र सरकारमधल्या लोकांच्या छुप्या पाठिंब्याशिवाय…”; संजय राऊत यांचं मोठं विधान
- Kiwi Fruit | हिवाळ्यामध्ये किवी खाऊन रहा ‘या’ आरोग्याच्या समस्यांपासून दूर
- Sushma Andhare | “देवेंद्रभाऊ करे तो रासलीला, हम करे तो…”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला
- Kriti Sanon | कृती आणि प्रभास करताय एकमेकांना डेट?, वरुण धवनने केला खुलासा
- Ruturaj Gaikwad | एका ओव्हरमध्ये 7 छक्के मारत ऋतुराजने रचला इतिहास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

