Share

Sushma Andhare | “देवेंद्रभाऊ करे तो रासलीला, हम करे तो…”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला 

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | मुंबई : शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. याच पार्वश्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी वीजबिलाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा खास शैलीत समाचार घेतला आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुलढाण्यातील चिखलीत शेतकरी मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीसांची एक ऑडिओ क्लीप उद्धव ठाकरे यांनी त्या सभेत लावली. महाविकास आघाडीचे सरकार असताना वीजबिल माफ करा, अशी मागणी फडणवीसांनी केली होती. ती क्लीप लावून आता शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवसींना दिलं होतं.

त्याला देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. “वीजबिल माफ करू असं मी कधीच म्हटलं नाही. करोना काळात मध्यप्रदेश सरकारने वीजबिल स्थगित करुन नंतर माफ केलं. तोच पॅटर्न महाराष्ट्राने राबवावा, अशी मागणी केली असल्याचं फडणवीस म्हणाले. मात्र, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने एक रुपयाचीही सूट शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना वीजबिल प्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही, असं फडणवीस यांनी सांगितलं.

यावरून सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. “देवेंद्रभाऊ यांचं असं झालं की, ‘हम करे तो रासलीला आणि लोक करे तो कॅरेक्टर ढिला’ असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस जे करतात ते योग्य आणि दुसरे करतात ते अयोग्य हे पटवून देण्यात ते हुशार आहेत. महाराष्ट्र, मध्यप्रदेशाच्या कार्यकाळातील वीजबिल आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेल्या भूमिका याचा आलेख मांडण्याची माझी तयारी आहे, असे आव्हान सुषमा अंधारेंनी दिलं.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावण्यात आला. याबाबात बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, सरकार त्यांचं आहे. त्यामुळे काहीही होऊ शकतं. संजय राऊत यांचं स्पिरीट आम्हाला माहीत आहे. समन्स, नोटिसा, कारवाई किंवा तुरुंगवास असला, तरी राऊत यांचं स्पिरीट कशानंही झुकणार नाही. थांबणार नाही. ते लढत राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!