मुंबई: अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) ही बॉलीवूड मधील अशी अभिनेत्री आहे, जी आपल्या वैयक्तिक आयुष्याला खूप खाजगी ठेवते. तिच्या आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असते. सध्या कृती सेनन (Kriti Sanon) आणि अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) त्यांच्या ‘भेडिया’ (Bhediya) चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरुण धवनने कृतीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. वरुणच्या या खुलास्यानंतर कृती साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) डेट करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भेडियाच्या प्रमोशनमुळे वरून धवन आणि कृती सेनन सध्या एकत्र दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरून आणि कृती चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) च्या रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा 10’ मध्ये गेले होते. या शोमध्ये धमाल सुरू असताना वरुणने कृतीच्या आयुष्याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.
कृती सेनन (Kriti Sanon) आणि प्रभास (Prabhas) करताय एकमेकांना डेट?
करण जोहरने झलकच्या सेटवर वरुण धवनला विचारले होते की, त्याच्या आयुष्यात कधी क्रितीचे नाव आहे का? वरुण यावर उत्तर देत म्हणाला, माझ्या आयुष्यात कीर्तीचे नाव कधीच नव्हते. कारण कीर्तीचे नाव कुणा दुसऱ्याच्या हृदयात आहे. एक माणूस आहे जो मुंबईत नाही. तो सध्या दीपिका पादुकोण सोबत शूटिंग करत आहे. वरुणच्या या वाक्यानंतर कृती हसून लाजायला लागली. यानंतर असे लक्षात येते की वरुण प्रभासचे नाव घेत होता.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रभास मुंबईबाहेर बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सोबत एका चित्रपटाची शूटिंग करत आहे. वरुणच्या या उत्तरानंतर कृती आणि प्रवास एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर कृती आणि प्रवास लवकरच आदिपुरुष चित्रपटांमध्ये दिसणार आहे. या चित्रपटांमध्ये प्रभास प्रभू श्रीरामांची तर कीर्ती माता सीतेची भूमिका साकारणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ruturaj Gaikwad | एका ओव्हरमध्ये 7 छक्के मारत ऋतुराजने रचला इतिहास
- MSRTC Ricruitment | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू
- Suryakumar Yadav | विराट कोहलीसोबत सामना झाल्यास कोण जिंकणार?, प्रश्नावर सूर्याने दिले मजेशीर उत्तर
- Shubhaman Gill | शुभमन गिलने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम
- Immunity Booster Tips | हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवायची असेल, तर करा ‘या’ आयुर्वेदिक टिप्स फॉलो


