Share

Ruturaj Gaikwad | एका ओव्हरमध्ये 7 छक्के मारत ऋतुराजने रचला इतिहास

Published On: 

काल विजय हजारे ट्रॉफी 2022 (Vijay Hazare Trophy 2022) च्या उपांत्य फेरी (Semi Final) मध्ये महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ने उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये इतिहास रचला आहे. या सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाड ने 159 चेंडूमध्ये 220 धावांची नाबाद खेळी खेळली. यामध्ये त्यांनी 10 चौकारांनी 16 षटकार मारले. एवढेच नाही तर ऋतुराज गायकवाडने या सामन्यांमध्ये इतिहास रचला आहे. त्याने या सामन्यादरम्यान एका षटकात 7 षटकार मारले आहेत.

7 छक्के मारत ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) ने रचला इतिहास

ऋतुराज गायकवाड याने उत्तर प्रदेशविरुद्ध सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीमध्ये उत्तर प्रदेशच्या स्पिनर गोलंदाज शिवा सिंगला एका षटकात 7 षटकार ठोकले. ऋतुराज ने 49 व्या षटकामध्ये हा पराक्रम केला. या षटकांमध्ये गोलंदाजाने नो बॉल टाकला ज्यावर ऋतुराजने शानदार षटकार मारला. ऋतुराज गायकवाडच्या अप्रतिम खेळीनंतर महाराष्ट्राने पन्नास  षटकात 5 गडी गमावून 330 धावा केल्या.

या सामन्यामध्ये ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त महाराष्ट्राचा इतर कोणताही खेळाडू चांगली फलंदाजी करू शकला नाही. या सामन्यामध्ये गायकवाड शिवाय अजीम काझी आणि अंकित बावणे यांनी 37-37 धावांची योगदान केले. तर दुसरीकडे कार्तिक त्यागीने उत्तर प्रदेशसाठी या सामन्यांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने दहा षटकात 66 धावा देत 3 बळी घेतले.

ऋतुराज गायकवाड आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून चांगली कामगिरी करत असतो. त्यामुळे चेन्नईने ऋतुराजला या हंगामासाठी संघात कायम ठेवले आहे. दरम्यान, ऋतुराजची विजय ट्रॉफी मधील ही कामगिरी पाहून संघ आणि चेन्नईचे चाहते नक्कीच खुश होतील. 220 धावांच्या नाबाद खेळीनंतर ऋतुराज गायकवाडने सर्वांचीच मनं जिंकली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही ऋतुराजचे जोरदार कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!