Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra Karnataka Borderism) सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
जत तालुक्यातील उमराडी गावात कन्नड वेदिका संघटनेच्या काही लोकांनी झेंडे फडकवले. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कर्नाटक प्रकरणावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना काय वाटतं त्यांना ते विचारलं पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हंटल. ज्या दोन मंत्र्यांना सीमा भागातलं काम दिलेलं आहे ते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraje Desai) हे तीन तारखेला बेळगावला चालल्याचं वाचलं असल्याचं ते म्हणाले.
“कर्नाटकातील लोक महाराष्ट्रात येतात, झेंडे मिरवतात हे कर्नाटक सरकारच्या पाठिंब्याशिवाय होणार नाही व यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणाचा तरी पाठिंबा असणार”, अशी शंका उपस्थित करत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हे सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर महाराष्ट्रावरचे हल्ले वाढत चाललेले आहेत, असा आरोपही संजय राऊतांनी केलाय.
“काश्मीर फाईल या चित्रपटात एका पक्षाचा प्रचार दिसत आहे व त्यामध्ये एका पक्षाची बाजू घेतलेली आहे. या चित्रपटानंतर काश्मीरमध्ये सर्वात जास्त पंडितांवर हल्ले झालेले आहेत. केंद्र सरकारला विनंती आहे की, त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर असे राजकारण करू नये. महाराष्ट्र घाबरणारा नाही”, असं इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “देवेंद्रभाऊ करे तो रासलीला, हम करे तो…”; सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला
- Kriti Sanon | कृती आणि प्रभास करताय एकमेकांना डेट?, वरुण धवनने केला खुलासा
- Ruturaj Gaikwad | एका ओव्हरमध्ये 7 छक्के मारत ऋतुराजने रचला इतिहास
- MSRTC Ricruitment | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन प्रकिया सुरू
- Suryakumar Yadav | विराट कोहलीसोबत सामना झाल्यास कोण जिंकणार?, प्रश्नावर सूर्याने दिले मजेशीर उत्तर


