Sanjay Raut | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसेच्या गटाध्यक्षांच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावरून त्यांची मिमिक्री केली होती. राज ठाकरे यांच्या या टीकेचा ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
ते म्हणाले, “हे आवाज काढणं, अमूक करणं, तमूक करणं हे खूप झालं. यापलिकडे आपण आता मॅच्युअर्ड झाला आहात. थोडं पलिकडे पाहा. उद्धव ठाकरेंवर टीका करून किंवा अन्य कुणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार? कुणाचंही. मी एका पक्षाचं नाव घेत नाही.” काही विधायक कामे करा. संघटनात्मक कामे करा. जे आम्ही करत आहोत. आमच्या पक्षावर एवढी संकटं आहेत. तरीही आम्ही काम करत आहोत, लढत आहो,” असंही ते म्हणाले.
“राजकारण म्हणजे मिमिक्री नाही. मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही जॉनी लिव्हरची पाहू. तीही ओरिजनल. आम्हाला मुद्रा अभिनय, नाट्याभिनय पाहायचा असेल तर आम्ही जॉनी लिव्हरचा पाहू. आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा. इतर अनेक आहेत. आम्ही खरी मिमिक्री पाहू”, असा टोला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचं नाव न घेता लगावला.
जे आमच्यावर टीका करत आहेत. त्यांनी बुलढाण्याची सभा पाहायला हवी होती. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकायला हवं होतं. अख्खा बुलढाणा त्या दिवशी रस्त्यावर उतरला होता. उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी हे महाराष्ट्राने पाहिलंय, असंही संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Dry Skin Tips | हिवाळ्यात त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी रात्री झोपेपूर्वी लावा ‘या’ खास गोष्टी
- Sushma Andhare | “ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला
- Devendra Fadnavis | “उद्धव ठाकरेंनी मनाचीच नाही तर जनाची पण लाज बाळगावी” ; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
- Urfi Javed | चेतन भगतच्या विधानावर उर्फीने दिले चोख उत्तर, म्हणाली…
- Raj Thackeray | “अरे गधड्या तुझी लायकी…”; राज ठाकरेंची राहुल गांधींवर सडकून टीका


