Share

Sushma Andhare | “ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”; सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

Sushma Andhare | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी मुंबईत सभेत बोलताना राज्यातील अनेक मुद्द्यांवर टीका केली. “एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही”, असं विधान राज ठाकरेंनी केलं. या विधानावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरेंना मिश्किल टोला लगावला आहे.

त्या म्हणाल्या, “राजभाऊंचा तो स्वभाव नाही, असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा चांगलं वाटतं. पण शब्द सत्यातसुद्धा उतरले पाहिजेत. ईडीच्या नोटिशीनंतर ‘लाव रे तो व्हिडीओ’चा ‘बंद रे व्हिडीओ’ का झाला?”, असा खोचक सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी राज ठाकरे यांना केलाय.

“ज्या देवेंद्र फडणवीसांनी मनसे म्हणजे ‘मतदार नसलेली सेना’ म्हणत अवहेलना केली, त्यांना तुम्ही ठामपणे उत्तरं देऊ शकत नाही. तुम्ही जोर दाखवता तो कुटुंबात. भावकीत भांडणं करण्याचीच तुम्ही शिरशिरी दाखवता. यावरुन कळतं पैसे कुणी घेतले किंवा ईडीच्या नोटिशीची भीती कुणाला वाटली आहे”, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

पुढे त्या म्हणतात, “मराठीचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राचं नवनिर्माण करू पाहात आहे असं तुम्ही सांगता. पण नेमकं तुम्ही काय निर्माण करू पाहात आहात. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांबद्दल आपण काहीच बोलू इच्छित नाही. त्यांच्या पायउतार होण्याबाबत तुम्ही ठामपणे वक्तव्य करू शकत नाही.”

दरम्यान, ‘इतर राज्यांचाही विकास झाला पाहिजे’ आस राज ठाकरे यांनी म्हंटल होतं. या राज ठाकरेंच्या विधानावरुनही अंधारेंनी चांगलाच समाचार घेतला. “तुमच्या पक्षाचं नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरुन ‘संघराज्य सेना’ करा”, असा खोचक सल्ला सुषमा अंधारेंनी दिलाय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!