Share

Urfi Javed | चेतन भगतच्या विधानावर उर्फीने दिले चोख उत्तर, म्हणाली…

Published On: 

मुंबई: सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत (Chetan Bhagat) सध्या सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे. एका कार्यक्रमांमध्ये लेखक चेतन भगत यांनी आजच्या तरुणांना नियमित पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला. त्यावेळी चेतन भगत म्हणाले होते की,”इंटरनेट ही एक खूप चांगली गोष्ट आहे, पण तरुण पिढी इंटरनेटच्या आहारी गेली आहे. आणि त्यामुळे तरुण कमवत होत चालले आहे. तरुण मुलं दिवसभर फोनवर असतात आणि फोटो लाईक करत असतात. त्याचबरोबर अनेक मुले उर्फी जावेद (Urfi Javed) च्या फोटोंना लाईक करतात. उर्फीचे फोटो आणि कपडे कसे असतात हे मला सगळं माहित आहे. उर्फी तरुणांना दिशाभूल करत आहे.” या घटनेनंतर उर्फीने चेतन भगत ना ‘Me too’ चळवळीची आठवण करून दिली.

चेतन भगतने उर्फीवर बलात्कार संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला आहे. यामध्ये तो म्हणाला आहे की,”यामध्ये उर्फीचा दोष नाही. ती तिचं करिअर घडवत आहे. लोक लपून-छपून उर्फीचे फोटो बघत आहे. उर्फीचे फोटो मी पण बघत आहे. मला उर्फी सारखे अनेक लोक भेटत असतात.”

चेतन भगतच्या या विधानाला उत्तर देत उर्फीने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये चेतन भगतवर निशाणा साधला आहे. तिने स्टोरी पोस्ट करत लिहिले आहे की,”तुम्ही तुमच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीला इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपवर मेसेज करत होता तेव्हाही त्या मुलींच्या कपड्याने तुम्हाला भडकवले होते. हे असे म्हणणारे पुरुष स्वतःच्या कमतरता मान्य करण्याऐवजी स्त्रियांना आणि त्यांच्या कपड्यांना दोष देत असतात. तुम्ही गरज नसताना मला तुमच्या चर्चेमध्ये आणले आहे. माझ्या कपड्यांबद्दल बोलताना तुम्ही म्हणाले की तरुण मुले त्यामुळे भटकत असतात. पण तुम्ही तुमचा संदेश देत तरुण मुलांना भरकटत तर नव्हता ना?”

पुढे उर्फी म्हणाली की,”तुम्ही लोकांनी बलात्कार संस्कृतीला प्रोत्साहन देणे थांबवा. श्री चेतन भगत पुरुषांच्या गैरवर्तनासाठी स्त्रियांना जबाबदार ठरवणे ही आता जुनी विचारधारा झाली आहे. स्त्रियांना दोष द्या पण आपली चूक ओळखू नका. तुमच्यासारखे लोक तरुणांना शिकवत आहे की स्त्रियांच्या कपड्यांवर त्यांना दोष कसा द्यायचा.”

व्हिडिओमध्ये उर्फी पुढे म्हणाली की,”साहित्याचा आणि माझा काही एक संबंध नाही. त्यामुळे साहित्य उत्सवात माझे नाव घेण्याची काय गरज होती हे मला समजले नाही. सगळे लोक माझी पोस्ट शांतपणे पाहतात आणि म्हणतात माझ्यामुळे तरुण पिढी बिघडत आहे. तुम्ही तरुणांचे काका आहात, विवाहित आहात तरीही तुम्ही अर्ध्या वयाच्या मुलीला मेसेज करता आणि त्यांच्या पोस्ट बघत असतात.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!