Raj Thackeray | मुंबई : अनेक नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी “स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती”, असं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानामुळे मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला होता. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.
“महापुरुषांची बदनामी केली जात आहे. त्या दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर.डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का?”, असं म्हणत राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
“सावरकर यांना कोठे ठेवले होते, त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या, याची कल्पनातरी आहे का?” असा सवालही राज ठाकरे यांनी केला. पुढे ते म्हणाले, “सावरकरांनी माफी मागितली असे राहुल गांधी म्हणतात. स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते. आपण त्याचा कधीच विचार करणार नाही. आपण फक्त दयेचा अर्ज केला, असे म्हणणार. तुरुंगात ५० वर्षे सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून बाहेर येतो. बाहेर येऊन परत हंगामा करतो, असा सावरकरांचा विचार होता. याला स्ट्रॅटेजी म्हणतात.”
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या इतिहासातील प्रसंगही संगितला. “शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंगाला गड-किल्ले दिले. गड-किल्ले म्हणजे चितळेची बर्फी होती का. त्यावेळी मावळे थकलेले होते. आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे समोरून येत असलेल्या सैन्याला तोंड देणे शक्य नव्हते. गडकिल्ले फक्त लिहून द्यायचे होते. परिस्थिती निवळली की ते परत घेऊ, याला स्ट्रॅटेजी म्हणतात. हे ज्याला समजत नाही, तो गुळगुळीत मेंदूचा आहे,” असेही राज ठाकरे यांनी म्हंटल.
महत्वाच्या बातम्या :
- Type-2 Diabetes | टाईप-2 डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी करा रोज ‘ही’ योगासने
- Nora Fateh | ‘झलक दिखला जा’च्या मंचावर नोरा फतेहीने व्यक्त केल्या प्रेमभंगानंतरच्या भावना, म्हणाली…
- OnePlus 11 | ‘या’ खास वैशिष्ट्यांसह पुढच्या वर्षी लाँच होऊ शकतो OnePlus 11
- Government Scheme for Farmers | सरकारच्या ‘या’ योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकतो आर्थिक लाभ
- High Blood Pressure | उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ टीप्स फॉलो


