Devendra Fadnavis | मुंबई : बुलढाणा येथील शेतकरी संवाद मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा!, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. बुलढाण्यातील चिखलीमध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभा घेतली होती. बुलढाणा जिल्ह्यातील दोन आमदार आणि एक खासदार शिंदे गटात गेलेले आहेत. त्यामुळे या जिल्ह्याकडे उद्धव ठाकरे गटाचे विशेष लक्ष आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गट आणि राज्यपालांवर ताशेरे ओढले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “वीज बिल माफ करु, असे मी कधीच म्हटलं नाही. कोरोना काळात मध्यप्रदेश सरकारने कोरोना काळापुरते वीज बिल माफ केलं होत. ते पॅटर्न कोव्हिड करता आणा म्हणून मी सांगितलं होत. मात्र तेव्हाचे उद्धव ठाकरे यांचे सरकार निर्दयी होते. एका नव्या पैश्याची सुट त्यांनी शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे यांना बोलायचा अधिकार नाही. यांनी शेतकऱ्यांचे कनेक्शन कट केले आहेत. त्यामुळे हे कुठल्या तोंडाने बोलत आहेत. आम्ही जे बोलतो ते करतो. मी तात्काळ सांगितले, कोणीही कनेक्शन तोडू नये, चालू बिल घ्यायचे कोणीही थकबाकी मागायची नाही, असे पत्रक कंपनीने काढले आहेत. त्यामुळे बोलणाऱ्यांनी जणाची ठेवली पाहीजे आणि मनाची देखील ठेवली पाहीजे.”
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे –
राज्यात वीज कापणी सुरु आहे. लाईट बिलासाठी तकादा लावला जात आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा जुना व्हिडीओ ऐकवत टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात असताना वीज बिल माफीची मागणी केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले, “आज तुम्ही त्या ठिकाणी आणि मी या ठिकाणी आहे. शेतकर्यांचे वीज बील माफ करा! खाली असताना वेगळी भाषा आणि वर बसल्यावर वेगळी भाषा? देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा!”
महत्वाच्या बातम्या :
- Raj Thackeray | “अरे गधड्या तुझी लायकी…”; राज ठाकरेंची राहुल गांधींवर सडकून टीका
- Type-2 Diabetes | टाईप-2 डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी करा रोज ‘ही’ योगासने
- Nora Fateh | ‘झलक दिखला जा’च्या मंचावर नोरा फतेहीने व्यक्त केल्या प्रेमभंगानंतरच्या भावना, म्हणाली…
- OnePlus 11 | ‘या’ खास वैशिष्ट्यांसह पुढच्या वर्षी लाँच होऊ शकतो OnePlus 11
- Government Scheme for Farmers | सरकारच्या ‘या’ योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकतो आर्थिक लाभ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

