🕒 1 min read
मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde) यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा करुणा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले आणि अनेक बायका लपवल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी हे वक्तव्य केले. यावरच भाजप नेते निलेश राणे यांनी खोचक शशब्दांत टीका केली आहे.
“धनंजय मुंडेंना स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं. ‘मुंडे 11’… हिंदूचे कायदे धनंजय मुंडेंना लागू होत नाहीत का? यांची आमदारकी पण रद्द होते कारण यांनी निवडणुक आयोगाला खोटी माहिती दिली, त्यांनी स्वतः मान्य केले आहे. यांना जंगलात पाठवा, पिसळलाय, अशा शब्दात निलेश राणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे 11
हिंदूचे कायदे धनंजय मुंडे ला लागू होत नाही का?? ह्याची आमदारकी पण रद्द होते कारण याने निवडणुक आयोगाला खोटी माहिती दिली, त्यांनी स्वतः मान्य केले आहे.
याला जंगलात पाठवा, पिसळलाय. https://t.co/7vcRcJZaqO— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 24, 2022
दरम्यान यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनीही टीका करत म्हटले की, “इतका आदर्श सामाजिक न्याय मंत्री आजवर राज्याला लाभला नाही.” दरम्यान करुणा मुंडे यांच्या या दाव्यानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक प्रतिक्रिया उमटत असून भाजपने यावरून थेट मविआ सरकारला निशाण्यावर धरले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “विरोधी पक्षनेते कितीही बोंबलले तरी…”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- RR आबांच्या पुत्राने मागणी करताच धनंजय मुंडेंची तातडीने नियोजन करण्याची सूचना
- “गरज सरो, वैद्य मरो असं केंद्राचं धोरण”, महागाईवरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा
- Women’s WC 2022: WI vs SA सामना रद्द झाल्याने भारताच्या अडचणीत वाढ ; पुढचा सामना असेल ‘करा किंवा मरा’
- “…असा उन्मत्तपणा न्यायालयाकडे चालत नाही”, भातखळकरांचा सुभाष देसाईंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
