🕒 1 min read
मुंबई : महिला विश्वचषक २०२२ चा २४ वा सामना इंग्लंड आणि पाकिस्तान संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात इंग्लिश संघाने पाकिस्तानचा ९ गडी राखून पराभव करत एकतर्फी विजय मिळवला. सामन्यात पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला होता. पण, या पराभवाने टीम इंडियालाही मोठा धक्का बसला आहे. विश्वचषक जसजसा अंतिम फेरीच्या जवळ येत आहे, तसतसा त्याचा थरार वाढतच चालला आहे.
आज इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानी संघ (ENG vs PAK) अवघ्या ४१व्या षटकांत १०५ धावांत गारद झाला. याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लिश संघाने १९.२ षटकांत केवळ १ गडी गमावून सामना जिंकला. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर इंग्लंडला पॉइंट टेबलमध्ये जबरदस्त फायदा झाला आहे. इंग्लिश संघाने विजयानंतर थेट चौथ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहोचण्यासोबतच संघाच्या धावगतीमध्येही जबरदस्त फायदा झाला आहे. या जोरावर आता इंग्लंड संघाने भारताला मागे टाकले आहे.
Which teams will claim the final two spots in #CWC22? ???? pic.twitter.com/yTwNH5Xp4J
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 24, 2022
पाकिस्तानच्या दारुण पराभवानंतर भारतीय संघ आता पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. टीम इंडियाला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर या लीगमधील शेवटचा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागेल. टीम इंडिया २८ मार्चला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साखळी सामन्यातील शेवटचा सामना खेळणार आहे. त्याचबरोबर जेतेपदाच्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवण्यासाठी इंग्लिश संघालाही शेवटचा सामनाही जिंकावा लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- उद्योगमंत्री सुभाष देसाईंना औरंगाबाद खंडपीठाचा दणका; नेमके कारण काय?
- “धनंजय मुंडेंना स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं”, करुणा मुंडेंच्या ‘त्या’ आरोपांनंतर निलेश राणेंचा टोला
- आमच्या प्रेमकहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्प्यात- करुणा मुंडे
- रवी शास्त्रीचें मोठे वक्तव्य; ‘विराटने कर्णधापद सोडणे इमानदारी…’
- RR आबांच्या पुत्राने मागणी करताच धनंजय मुंडेंची तातडीने नियोजन करण्याची सूचना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
