Share

अस्तनीतल्या निखाऱ्यांना वेळीच दूर करा हे बाळासाहेब सांगायचे – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांकडे विविध पुरावे सादर केल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी टॅप केला होता असा आरोप करण्यात येत आहे. त्यांनी फोन टॅपिंग करून फडणवीसांना मदत केल्याचा आरोप देखील महाविकास आघाडीतील नेते करत आहेत.

याचवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील जोरदार टीका केली आहे. एकदा हात पोळूनही महाविकासआघाडीच्या नेत्यांनी रश्मी शुक्ला इतका विश्वास कसा ठेवला, याचं आश्चर्य वाटतं. राजकारणात किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांवर इतका विश्वास कधीही ठेवायचा नसतो. खांद्यावर विश्वासाने ठेवलेली मान हे अधिकारी कधीही बगलेत दाबू शकतात, हे आताच्या उदाहरणावरु दिसून आले आहे. अत्यंत सहजपणे सत्तेत जाऊन बसलेल्या लोकांनी या सगळ्या अनुभवानंतर तरी शहाणपण शिकावे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

तर, अधिकाऱ्यांवर कधीही विसंबून राहू नका, अस्तनीतील निखाऱ्यांना वेळीच दूर करा, ही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण होती. राज्यात युतीची सत्ता आल्यावर बाळासाहेबांनी तत्कालीन मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांची तातडीने बदली करण्याचे आदेश दिले होते, याची आठवण संजय राऊत यांनी करुन दिली. तसेच महाराष्ट्रात सत्तास्थापनेचे नाट्य सुरु असताना शरद पवार आणि माझा फोन टॅप झाला होता, असेही त्यांनी सांगितले. तसेच पत्रकारांवरही नजर ठेवली जात होती. इतकं करुनही भाजपची सत्ता आली नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!