Share

बाळासाहेबांची खोली म्हणजे बंद खोली नाही, आमच्यासाठी ते मंदिर – संजय राऊत

Published On: 

नवी दिल्ली : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. भाजपची महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर अमित शाह हे राज्यात आल्यामुळे ते काय बोलणार याकडे राजकीय क्षेत्राचं लक्ष्य लागलं होतं. तर, ऑपरेशन लोटस होणार अशी चर्चा देखील काही भाजप नेत्यांमुळे पसरली होती.

दरम्यान, अमित शाह यांनी या कार्यक्रमावेळी महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरे व शिवसेनेवर हल्लाबोल केल्याचं दिसून आलं. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे नेमकं अमित शाह व त्यांच्यामध्ये बंद खोलीत काय झालं होतं याच्या दुसऱ्या बाजूवर अमित शाह यांनी भाष्य केलं आहे. ‘उद्धव ठाकरे म्हणतात मी त्यांना एका बंद खोलीत वचन दिलं होतं. पण मी कधीही काहीही बंद खोलीत करत नाही. जे करायचं ते सर्वांसमोर उघडउघड करतो. मी कधीही बंद खोलीचं राजकारण केलं नाहीये. मी जनतेत राहणारा व्यक्ती आहे. मी कधीही घाबरत नाही जे होतं ते मी सर्वांसमोर बोलतो. त्यांना असं कोणतंही वचन दिलं नव्हतं, हेच सांगायला मी इथं आलोय’ अस अमित शहा म्हणाले आहेत.

यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. बंद खोलीत तुम्हीच आलाच मातोश्रीवर, आम्ही तर आमंत्रण दिलं नव्हतं. तुम्हीच युती करण्यासाठी आला होता. बाळासाहेबांची खोली म्हणजे बंद खोली नाही, आमच्यासाठी ते मंदिर आहे. तिथे भाजपाचे अनेक लोक यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद घेऊन गेले आहेत. अडचणीत सापडलेल्या अनेक भाजपा नेत्यांची सुटका केली आहे. असे अनेक प्रकार आम्ही पाहिले आहेत. अनेकजण सर्वोच्च पदावर असले तरी या राजकीय घडमोडी इतरांपेक्षा जास्त पाहिल्या आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!