मुंबई : विदर्भ आणि मराठवड्यातील जनतेचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वैधानिक विकास महमंडळाच्या मुद्यावरून अधिवेशनात चांगलीच चर्चा रंगली. राज्यपालांनी १२ सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितल्यावर प्रलंबित १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्यपाल आणि सरकारच्या वादात भर टाकत आहे.
मागील कित्येक दिवसांपासून विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. राज्य सरकारने एकूण 12 नियोजित आमदारांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवून कित्येक महिने झाले आहेत. मात्र, अद्याप कोश्यारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेल्या यादीला मान्यता दिलेली नाही. याच मुद्द्यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जोरदार टोला लगावला आहे.
“महाराष्ट्र हा संतांचा प्रदेश आहे. करुणेचा उगम हा महाराष्ट्रातूनच झाला. कदाचित म्हणूनच राज्यपाल भगतसिंह यांना महाराष्ट्रत रमावं वाटतं. आमचे राज्यपाल करुणेचा सागर आहेत. याच करुणा भावनेने त्यांनी कायदा आणि घटनेवर करुणा दाखवावी. 12 राज्यपाल नियुक्त सदस्य त्यांनी त्यांच्या मांडीखाली दाबून ठेवले आहेत. ते त्यांनी मोकळे करावेत,” असे संजय राऊत म्हणाले. तसेच राज्यपाल नियुक्त आमदार मोकळे केले तर राज्यपालांच्या मनात घटनेविषयी करूणा आहे, हे देशाला समजेल,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
- औरंगाबाद, गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूरकरांसाठी आनंदाची बातमी
- महाशिवरात्रीच्या यात्रा रद्द; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
- ‘या’ टेलिकॉम कंपनीने केला जाहिरात व्यवसायात प्रवेश !
- पश्चिम बंगालच्या निवडणुकीसाठी ‘या’ पक्षासोबत आघाडी केल्यानं काँग्रेसचे दिग्गज नेते नाराज
- जगा आणि जगू द्या ! सुशांतच्या चाहत्यांना अंकिताची विनंती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

