🕒 1 min read
नवी दिल्ली- पश्चिम बंगालच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वामदल, काँग्रेस आणि आयएसएफने आघाडी केली आहे. मात्र, पीरजादा अब्बास सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखालील ISF आणि काँग्रेसमध्ये फार काही सख्य नाही असे असूनही काँग्रेसने इंडियन सेक्युलर फ्रंट (ISF)सोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयावरुन आता काँग्रेसमध्येच कलगीतुरा सुरु झाल्याचे चित्र निर्माण होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा आणि प.बंगालचे अध्यक्ष खासदार अधीर रंजन चौधरी आमने-सामने आले आहेत.कॉंग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना नेतृत्वाला देखील लक्ष्य केले आहे.
“ISF आणि अशा दुसऱ्या पक्षांशी आघाडी ही काँग्रेसच्या विचारधारांच्या विरोधात आहे. जो गांधी आणि नेहरु यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या सिद्धांतावर आधारीत आहे. या मुद्द्यावर काँग्रेस कार्य समितीत चर्चा झाली पाहिजे”, असं ट्वीट आनंद शर्मा यांनी केलं आहे.
‘जातीयवादाविरोधात लढाई लढताना काँग्रेस निवडक भूमिका घेऊ शकत नाही. या आघाडीला पाठिंबा देणं वेदनादायी आणि लज्जास्पद आहे. बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावं’, असंही आनंद शर्मा म्हणाले.
या टीकेला उत्तर देताना चौधरी म्हणाले, हायकमांडशी चर्चा केल्यानंतरच आघाडीचा निर्णय घेतला आहे. सीपीआय (एम) आघाडीचे नेतृत्व करत आहे. भाजपला हरविण्यासाठी आम्ही कटिबध्द आहोत. काँग्रेसला आघाडीतील पूर्ण वाटा मिळाला आहे. आएसएफला डाव्या पक्षांकडून जागा दिल्या जाणार आहेत. असा टोला चौधरी यांनी शर्मा यांना लगावला आहे.
आघाडीला जातीयवादी म्हणणे म्हणजे भाजपच्या अजेंड्याला समर्थन करण्यासारखे आहे, पंतप्रधान मोदींचे कौतुक करण्यात वेळ वाया घालवू नका. स्वत:साठी सोयीच्या जागा शोधण्याची धडपड थांबवा, अशी विनंतीही चौधरी यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहितसह ‘हे’ खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून होऊ शकतात बाहेर
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून; लग्न ठरले म्हणून पार्टनरला संपवले
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

