🕒 1 min read
लातूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर लातूर जिल्ह्याचे ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे दरवर्षी भरणारी यात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे. मंदिर देवस्थानाचे प्रशासक व धर्मादाय उपायुक्त यू. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उपजिल्हाधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार, मंदिर विश्वस्त अशोक भोसले, तलाठी दत्ता शिंदे, विशाल झांबरे, व्यवस्थापक दत्ता सुरवसे हे या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत यात्रा पूर्णतः रद्द करण्याचा निर्णय एक मताने घेण्यात आला. मात्र ,यात्रा रद्द करण्यात आली असली तरी ठराविक मंडळींच्या उपस्थितीत कोरोनाचे नियमाचे पालन करत विधिवत पूजा करण्यात येणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री गवळी समाजातर्फे केला जाणारा दुग्धाभिषेक केवळ ५ व्यक्तींच्या उपस्थितीत होईल. यासाठी मंदिर विश्वस्ताकडून त्यांना पास दिले जाणार आहेत.
गौरीशंकर मंदिरापासून काढण्यात येणारी मानाच्या काठ्यांची मिरवणूकही यावर्षी रद्द करण्यात आली. या काठ्यांचे मंदिराच्या गाभाऱ्यातच प्रत्येकी दोन मानकऱ्यांच्या हस्ते पूजन होईल. तसेच यात्रा कालावधीतील भजन- कीर्तन व काकडा कोरोना नियमाचे पालन करत ११ भावीकांच्या उपस्थितीत केले जाईल. शिवरात्रीनिमित्त दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासक श्रीमती पाटील यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …अन् भर सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी मानले अजित पवारांचे आभार !
- महिला दिनी होणार समृद्धीच्या लेकींचे ‘नामकरण’
- फास्टॅग अनिवार्य झाल्यास इंधनावरील खर्चात बचत- नितीन गडकरी
- ‘दरवाढ कमी केली नाही तर वीजपंप सरकारच्या डोक्यात घालू’, विधानभवनाबाहेर राम सातपुते आक्रमक
- धक्कादायक! १०० कोटींचा घोटाळा; केंद्रेकरांनी दिले चौकशीचे आदेश


