🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद- अहमदनगर या रेल्वेमार्गाची गेली अनेक वर्षे प्रतीक्षा केली जात होती. आता या मार्गाची प्रतीक्षा संपणार असल्याचे दिसून येत असून सर्वेक्षणासाठी रेल्वेच्या सर्वेक्षण विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर आपल्या पथकासह सोमवारी (दि.१) औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. हे पथक सहा दिवस या नवीन मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम करणार आहेत.
औरंगाबाद-अहमदनगर या मार्गाचे सर्वेक्षण करण्याला २०१८ मध्ये मंजुरी मिळाली होती. परंतु अद्याप या मार्गाचे सर्वेक्षण झालेले नव्हते. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर आता याला यश मिळाले आहे. हे सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वेच्या सर्वेक्षण विभागाचे मुंबई येथून डेप्युटी जनरल मॅनेजर व पाच ते सहा अधिकाऱ्यांचे पथक सकाळीच शहरात दाखल झाले आहे. हे पथक १ मार्च ते ६ मार्च दरम्यान औरंगाबाद, गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर, अहमदनगर आदी तालुक्यांतील जागेचे सर्वेक्षण करणार आहे. या मार्गामुळे गंगापूर, नेवासा, शनिशिंगणापूर आदी भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गामुळे येणाऱ्या काळात मुंबईप्रमाणे औरंगाबाद पुण्याशी जोडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्योजकांशी चर्चा : औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी काल सकाळी पथक शहरात दाखल होऊन सकाळी उद्योजकांशी चर्चा केली. यावेळी सीएमआयएसह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. औरंगाबाद-अहमदनगर मार्गाचा सर्वेक्षण ते करणार असून आम्ही सर्व उद्योजक पथकाला लागणार संपूर्ण डाटा पुरविणार असून औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाबाबत सकारात्मक असल्याची अपेक्षा सीएमआयएचे अध्यक्ष कमलेश धुत यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहितसह ‘हे’ खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून होऊ शकतात बाहेर
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून; लग्न ठरले म्हणून पार्टनरला संपवले
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?


