मुंबई : सध्या अभिनेत्री अंकिता लोखंडे तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठी नेहमी चर्चेत असते. तिच्या एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देखील तिने काही पोस्ट केल्या होत्या, ज्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आल्या होत्या. अधून-मधून अंकिता आपल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते तिचे हे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. तिच्या या व्हडिओला प्रचंड लाईक्स देखील मिळतात. परंतु अंकिताला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा देखील तेवढाच सामना करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी अंकिताच्या एका व्हिडीओला जोरदार ट्रोल केलं जात होत. काही लोकांनी लिहिले की, ‘सुशांतच्या मृत्यूनंतर ही फेमस झाली नाहीतर अगोदर हिला कुणी ओळखत नव्हतं. दुसऱ्याने लिहिले की, हिच्याकडे काही काम नाही खूपच फ्री वेळ आहे. बिग बॉस’मध्ये जाऊन मेहनतीने स्वत:चे नाव तयार कर असाही सल्ला देण्यात आला होता. सुशांतच्या नावावर फेमस होण्याची शॉर्टकट पद्धत चांगली नाही, तर अनेकांनी अंकिताला अनफॉलो करत असल्याचे म्हटंले देखील म्हटलं होत.
https://www.instagram.com/tv/CL3v_lni630/?utm_source=ig_web_copy_link
आता नुकताच अंकिताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अंकिता लोखंडे नुकतीच इनस्टाग्राम लाईव्ह अली होती. त्या दरम्यान तिने तिच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या त्या सोबत तिने सुशांच्या चाहत्यांना विनंती देखील केली आहे. अंकिता नेहमीच तिचे डान्सचे व्हिडीओ तिच्या इनस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या पोस्ट वरती सुशांतचे चाहते आपला राग व्यक्त करताना दिसतात. याच पार्शवभूमीवर अंकिताने सुशांतच्या चाहत्यांना विनंती केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम इंडियानं घाबरू नये, चौथ्या कसोटीसाठी ‘fair pitch’ तयार करावे ; शोएब अख्तरचा सल्ला
- रोहितसह ‘हे’ खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून होऊ शकतात बाहेर
- धक्कादायक! ‘या’ तालुक्यातील शासकीय कार्यालयतील दूरध्वनी बंद; नागरिकांची गैरसोय
- ‘अजित पवार मराठवाडा विदर्भात आले तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केले पाहिजे’
- मोठी बातमी : …तोवर राज्यातील घरगुती आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार नाही, अजितदादांची विधानसभेत ग्वाही


