सोलापूर – राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात होणार असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.दरम्यान दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे देखील नाव चर्चेत आहे मात्र पक्षातील जेष्ठ नेत्यांची पसंती जयश्री भालके यांच्या नावालाच असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने नोठा वाद निर्माण झाला.
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विजय देशमुख यांच्या निवडीवरुन राष्ट्रवादीत ठिणगी उडाली. युवराज पाटील यांनी नाराजी व्यक्त करत केली. युवराज पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नाराजीची दखल पक्षाने घेतली असून पक्षांतर्गत वाद मिटविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या पंढरपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अंतर्गत वाद मिटल्यानंतरच राष्ट्रवादीकडून उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- चाहत्यांना आश्चर्याचा धक्का रश्मिका चालावतीय शेतात नांगर पहा व्हिडीओ


