पुणे : पुण्यातील पोलिसांना पालिका प्रशासनाने पायलट प्रोजेक्ट म्हणून दहा सायकल दिल्या आहेत. त्यामुळे आता पोलीस सायकल्सवर पेट्रोलिंग करणार आहेत. वाढते इंधन दर आणि पर्यावरणपूरक पेट्रोलिंग व्हावं या दृष्टीने पोलीस प्रशासनाने सायकल पेट्रोलिंग करण्याचा निर्णय घेतला.
या सायकल्समध्ये विविध सोई करण्यात आल्या आहेत. स्टिक आणि बॉटल स्टॅण्डची व्यवस्था यामध्ये कण्यात आली आहे. त्या सोबत यामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा देखील कार्यान्वित केली आहे. पुण्यातील काही भागातील परिसर हा दाटीवाटीचा आहे. मोठी पोलीस वाहन आणि वाहनांची संख्या बघता जास्तीच पोलिसांना पेट्रोलिंग करता येत नव्हते.
तसेच नागरिकांचा पोलिसांच्या बरोबरचा वावर वाढावा आणि नागरिकांना सुरक्षित वाटेल असा हा निर्णय असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगत आहेत. तर पोलिसांच्या फिटनेस आणि इंधन खर्चाच्या दृष्टीने देखील चांगला निर्णय ठरेल अशी अपेक्षा पोलिसांना आहे. मात्र पुण्यात नव्याने सुरु झालेल्या या सायकल पेट्रोलिंगचा प्रयोग कितपत यशस्वी ठरणार हे पाहणे देखील मह्त्वाचे ठरणार आहे,
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारनं कुणालाही नकोसा वाटेल असा पहिला नंबर पटकावला’
- ‘व्यवहार माझे, जबाबदार वाझे!’ अमृता फडणवीस यांची बोचरी टीका
- ‘मला शिवसेना कळली, त्यामुळे खैरेंची गरज नाही, अंबादास दानवेंचा पलटवार
- कोरोना वाढतोय : आज पुण्यात तब्बल ‘इतक्या’ रुग्णांची नोंद
- चाहत्यांना आश्चर्याचा धक्का रश्मिका चालावतीय शेतात नांगर पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

