मुंबई – मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.
परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रासह देशात एकच खळबळ माजली.परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत देशमुख राजीनामा देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा भाजपने दिला आहे.
दरम्यान,या सर्व प्रकारानंतर महाविकास आघाडीच्या नेत्याचे तोंडचे पाणी पळाले असून बैठकांवर बैठका घेण्याचा धडाका सुरु आहे.प्रकरण अंगाशी येत असल्याने ठाकरे सरकारच्या पायाखालची वाळू सरकू लागली असल्याचे चित्र आहे.या मुद्द्यावरून केवळ भाजपच नव्हे तर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे देखील आक्रमक झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली ‘राज्यातील विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सरकारची प्रतिमा मलीन करायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी कितीही आरोप केले तरी सरकराच्या प्रतिमेला तडे जाणार नाहीत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांना महाराष्ट्रात घुसवून महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर घाला घालत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या राज्यातील वाढत्या हस्तक्षेपावर टीका केली. ‘केंद्रीय तपासयंत्रणांचे अधिकारी ढगातून खाली पडलेत का? आमच्या अधिकाऱ्यांना तपास करता येत नाही का? केंद्र सरकारने महाराष्ट्रात ईडी किंवा कोणतीही यंत्रणा आणून तपास केला तरी आम्हाला फरक पडत नाही. महाविकासआघाडी सरकार हे भक्कम आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.
विरोधी पक्ष परमबीर सिंह यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:ला खूप हुशार समजत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपतींचा नियम लागू करण्याचा प्रयत्न करीत असेल तर मी त्यांना चेतावणी देत आहे, तुम्ही स्वत: त्या अग्नीत जाल’ असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना लस न घेताच मिळालं लस घेतल्याचं प्रमाणपत्र; प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड
- पवारांच्या ‘त्या’ मागणीला माजी पोलीस आयुक्तांनी दिलं उत्तर; म्हणाले…
- ‘दिल्लीतील बैठका म्हणजे १०० कोटीच्या हिस्सेदारांची चाललेली धावपळ’
- ‘…परंतु त्यांनी वनडे मालिकेत राहुलला आणखी एक संधी द्यायला हवी’ ; गौतम गंभीर
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

