Share

Breaking news : मोठी बातमी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Pandey । मुंबई : सध्या राजकीय वर्तुळात दररोज मोठे गौयस्फोट होत असताना दुसरीकडे आज एक मोठी बातमी समोर आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली. संजय पांडे यांनी दिल्लीतील ईडीच्या मुख्यालयात आज तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

सध्या दोन वेगवेगळ्या प्रकरणात संजय पांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू असून ईडीने त्यांना आज दिल्लीमध्ये अटक केली आहे. त्यांच्यावर फोन टॅपींग केल्याचे देखील आरोप आहेत. या प्रकरणात त्यांची पाठीमागील काही दिवसांपासून चौकशी सुरु होती. या प्रकरणात चौकशीसाठी ते ईडी कार्यालायत मंगळवारी (19 जुलै) दाखल झाले होते. या वेळी ईडीने ही कारवाई केली. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआय कडून चौकशी करण्यात येत होती. दरम्यान ईडीने आज त्यांना अटक केली आहे.

तसेच भारतीय पोलीस सेवेतू (IPS) निवृत्त झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून संजय पांडे यांच्या पाठिमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आजच (19 जुलै) घेतली होती. त्यानंतर काही तासातच ईडीने कारवाई करत त्यांना अटक केल्याचे वृत्त आले. तसेच संजय पांडे यांचे सर्व जबाब मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा अन्वये नोंदवण्यात आल्याचीही माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!